Love And War : नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं ; विकी कौशलच्या लूकने वेधलं लक्ष; ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रफ अँड टफ अंदाज
Love And War : संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'चं तिसरं, सर्वात कमाल पोस्टर देखील आता समोर आलंय. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर आता विकी कौशल जबरदस्त अंदाजात दिसणार आहे.

Love And War : संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यांचा फर्स्ट लूक जाहीर झाला. त्या दोघांनंतर आता फायनली मेकर्सनी विकी कौशलचं (Vicky Kaushal) फर्स्ट लूक पोस्टरही जारी केलंय. विकी कौशलचा या नव्या अवताराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा रफ अँड टफ अंदाज चाहत्यांना बराच आवडला आहे. जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये विकी कौशलचा लूक खूपच इंटेन्स आणि रेट्रो व्हाईब देणारा दिसतोय. ओठांत सिगारेट आणि लायटरने ती पेटवणारा विकी, असा लूक पोस्टरमध्ये दिसतोय.
विकी कौशलच्या लूकची जोरदार चर्चाा
विकी कौशलपूर्वी मेकर्सनी या चित्रपटातील इतर दोन प्रमुख कलाकारांचा लूक रिव्हील केला होता. परवा रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर हा व्हिंटेज कारमध्ये दिसला. त्याचा दमदार लूक समोर आला. तर काल रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये लाल ड्रेस घातलेली आलिया भट्ट दिसली. त्यानंतर आता विकी कौशलची वेळ आहे. ”नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं.” असं लिहीतं त्याचा लूक शेअर करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत असून पुढल्या वर्षी 21 जानेवारी 2027 ला तो मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.
भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट हे त्रिकूट एकत्र दिसणार आहे. त्यामुळे त्यांचं काम पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
विकी कौशलचा शेवटचा चित्रपट
गेल्या वर्षी, फेब्रुवारी 2025 मध्ये ‘छावा’ या पिक्चरमधून विकी कौशलचा जबरदस्त अंदाज पहायला मिळाला होता. बॉक्स ऑफीसवर कमाल कामगिरी करत या चित्रपटाने जगभरात 800 कोटींपेक्षा दास्त कमाई केल्याचे समजते. आता तो लौकरच ‘महावतार’ मध्ये भगवान परशुराम यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.