AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : अनेक महिलांसोबत अफेअर, 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न, असं आहे 58 वर्षीय अभिनेत्याचं आयुष्य

Love Life : पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अनेक महिलांना 58 वर्षीय अभिनेत्याने केलं डेट, दुसरं लग्न 26 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत केल्यामुळे अभिनेता चर्चेत, आता जगतोय असं आयुष्य? अभिनेत्याचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यानंतर तुम्हीही देखील म्हणाल...

Love Life : अनेक महिलांसोबत अफेअर, 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न, असं आहे 58 वर्षीय अभिनेत्याचं आयुष्य
| Updated on: Dec 01, 2023 | 12:40 PM
Share

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी एक दोन नाही तर, चार लग्न देखील केली. पण देखील आज एकटं आयुष्य जगत आहेत. झगमगत्या विश्वात असाच एक अभिनेता आहे, जो त्याच्या फिटनेसमुळे अनेक तरुणींना घायाळ करतो. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 58 वर्षीय अभिनेता आता 26 वर्ष लहान तरुणीसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 58 वर्षीय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून मिलिंद सोमण आहे.

मिलिंद सोमण याचं नाव अनेक सेलिब्रिटी महिलांसोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, सर्वप्रथम मिलिंद सोमन याचं नाव मिस यूनिव्हर्स 1992 ची सेकेंड रनरअप मधू सप्रे हिच्यासोबत जोडण्यात आलं. दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. पण त्यांचं फार काळ टिकलं नाही. अखेर 1995 मध्ये मधू आणि मलिंद यांचं ब्रेकअप झालं.

मिलिंद सोमण याचं पहिलं लग्न

मिलिंद सोमण याची ओळख व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सेटवर मायलीन जंपनोईला हिच्यासोबत झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणी मायलीन यांनी 2006 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

मिलिंद सोमण याचं दुसरं लग्न

मिलिंद सोमण याचं नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडण्यात आलं. पण जवळपास 26 वर्ष लहान अंकिता कोंवर हिच्यासोबत लग्न केल्यानंतर मिलिंद चर्चेत आला. मिलिंद आणि अंकिता यांनी 2018 मध्ये लग्न केलं. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. तेव्हा अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल देखील केलं.

अंकिता आणि मिलिंद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर मिलिंद कायम पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर मिलिंद याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मिलिंद कायम पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या फोटो आणि व्हिडीओवक कमेंट आण लाईक्सचा वर्षाव करत असतात.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.