Bigg Boss 19 च्या घरात सुरु झाली लव्हस्टोरी! सलमान खान समोर गुडघ्यांवर बसून विचारलं, ‘मुझसे शादी करोगी….’, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 19: 'बिग बॉस 19' च्या घरात झालीये नव्या 'लव्हस्टोरी'ची सुरुवात, सलमान खान समोर 'तो' गुडघ्यांवर बसला आणि तिला विचारलं 'मुझसे शादी करोगी...', सध्या सर्वत्र 'बिग बॉस 19' शोची चर्चा...

Bigg Boss 19 च्या घरात सुरु झाली लव्हस्टोरी! सलमान खान समोर गुडघ्यांवर बसून विचारलं, मुझसे शादी करोगी...., व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Aug 31, 2025 | 9:32 AM

Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ शो आता चर्चेत येऊ लागला आहे. शो सुरु होऊन काही दिवस झाले असून घरातील ड्रामा फूल ऑन सुरु झाला आहे.. नेहमी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शोमध्ये काही प्रसिद्ध चेहरे आहेत. शोमध्ये प्रत्येकाने आपल्या खास अंदाजात खेळ सुरु केला आहे…एवढंच नाही तर, घरात आता ‘लव्हस्टोरी’ देखील सुरु झाली आहे.

सध्या ज्या कपलची चर्चा रंगली आहे, ते कपल दुसरं तिसरं कोणी नसूस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मृदुल तिवारी आणि पोलिश अभिनेत्री नतालिया जानोसजेक आहे… ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीपासून दोघांमध्ये खास नातं दिसून आला. अशात विकेंडका वारमध्ये सलमान खान नतालिया हिला विचारतो, ‘मृदुल तुला कसा वाटतो?’ यावर नतालिया म्हणते, ‘मृदुल माझा जीव आहे…’ त्यानंतर मृदुल याला देखील प्रचंड आनंद होतो. दोघांना पाहून घरातील सदस्यांना देखील आनंद होतो.

अखेर सलमान खान, मृदुल आणि नतालिया यांना डान्स करायला सांगतो. अशात मृदुल लगेच नतालिया हिचा हात पकडतो आणि डान्ससाठी तयार होतो. मृदुल आणि नतालिया अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर जिंदा है’ सिनेमातील ‘दिल दियां गल्ला’ गाण्यावर डान्स करु लागतो… दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सलमान खान याला देखील प्रचंड आनंद होतो.

 

 

डान्स झाल्यानंतर मृदुल गुडघ्यांवर बसतो आणि नतालिया हिला ‘मुझसे शादी करोगी…’ असं विचारतो… शोचा पहिला विकेंड मृदुल आणि नतालिया यांच्यासाठी फार खास ठरला. पण दुसरीकडे समान खान याने अन्य स्पर्धकांवर निशाणा देखील साधला…

सांगायचं झालं तर,  ‘बिग बॉस 19’ शोमधील वाद देखील आता समोर येऊ लागले आहेत. तर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 19’ आणि स्पर्धकांची चर्चा रंगली आहे. आता येत्या दिवसांत शो किती रंगात येतोय पाहणं मजेशीर ठरणार आहे.