Sunny Leone: 4 मुली गमावल्या… सनीचा IVF 4 वेळा फेल, आई होण्यासाठी मोजली मोठी रक्कम
Sunny Leone 4 Daughters Died: अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकताच काही धक्कादायक खुलासे केले आहे. तिच्या सहा पैकी चार गर्भ नष्ट झाल्यामुळे ती निराश झाली. या कठीण काळात तिला पतीकडून भावनिक आधार मिळाला, असं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

Sunny Leone 4 Daughters Died: अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आता सनी आणि तिचा पती डेनियल वेबर दोन मुलं आणि एका मुलीते आई – वडील आहे… सनीच्या मुलीचं नाव निशा आणि जुळ्या मुलांचं नाव अशर आणि नोआ असं आहे… सनी हिने मुलीला दत्तक घेतलं आहे. तर दोन मुलांचं सरोगेसीच्या मदतीने जगात स्वागत केलं आहे. सनी हिने सोहा अली खान हिच्या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे.
यावेळी सनी हिने आयव्हीएफ प्रक्रियेवर मोठं वक्तव्य केलं आहे. सनी म्हणाली, ‘खरं तर कोणतीच योजना नव्हती. पण खरी योजना तर सरोगेसीच्या मदतीने आई – वडीला होण्याची होती. त्यानंतर काही वर्षांनंतर आम्हाला आमच्या करीयरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. ती वेळ योग्य वेळ नव्हती… पण आमच्या मनात तिच योग्य वेळ होती. आम्ही आमच्या अडचणी कधीच कोणासोबत शेअर केल्या नाहीत…’
‘आयव्हीएफ उपचार सुरु होते. आम्ही आमचे अंडे जमा केले आणि सहा सुंदर गर्भ तयार झाले.. आमच्या 4 मूली आणि दोन मुलं होतं. पहिलं बाळ आम्हाला मुलगी म्हणून हवं होतं. पण तसं काही झालं नाही. अखेर आम्ही डॉक्टर बदलण्याचा निर्णय घेतला आणि आता दोन गर्भ म्हणजे माझी दोन मुलं माझ्या जवळ आहेत…’
View this post on Instagram
पुढे सनी म्हणाली, ‘त्या दरम्यान आम्ही दत्तक बाळासाठी देखील अर्ज केले. कारण आयव्हीएफ आणि सेरोगेसी प्रचंड मोठी प्रक्रिया आहे. जेव्हा उपचार तुमच्या बाजूने होत नाहीत तेव्हा निराशा वाट्याला येते… मला एका आठवड्यात कळलं की माझ्या चार मुली गेल्या आहे. या कठीण काळात आम्ही दोघांना एकमेकांना भावनिक साथ दिली.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, आमच्या सरोगेट आईमध्ये hCG चं प्रमाण जास्त होतं. IVF ची समस्या अशी आहे की गर्भ आत जाताच तुम्ही मानसिकदृष्ट्या गर्भवती असता. अशात मनात अनेक विचार सुरु असतात. पण नंतर कळतं असं काही होणार नाही. पिशवी तर रिकामी आहे … असं एका डॉक्टरने आमच्यासोबत दुसऱ्यांदा केलं. त्यामुळे आम्ही डॉक्टर बदल्याचा निर्णय घेतला… सध्या सर्वत्र सनी लिओनी हिची चर्चा सुरु आहे.
