AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Chief Mohan Bhagwat: …तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, संघ कार्यपद्धती बदलणार? काय दिले उत्तर?

RSS Chief Mohan Bhagwat: नागपूरमध्ये गुढी पाडव्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे संघ कात टाकणार का असा सवाल विचारल्या जात आहे. काय होणार आहे संघात बदल?

RSS Chief Mohan Bhagwat: ...तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, संघ कार्यपद्धती बदलणार? काय दिले उत्तर?
सरसंघचालक मोहन भागवतImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 19, 2026 | 2:04 PM
Share

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्या शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. संघाच्या प्रवासाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात संघाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देण्यात आली. संघाविषयी जनमाणसात जो किंतू-परंतूचा मुद्दा हा त्याला समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर नागपूरमध्ये गुढी पाडव्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. संघ कात टाकणार का असा सवाल आता विचारल्या जात आहे.

प्रश्न – शताब्दी वर्षात संघाने दिलेल्या पंच परिवर्तन बद्दल काय अनुभव आले?

संघाने शताब्दी वर्षाच्या काळात दिलेले पंच परिवर्तन सर्वत्र स्वीकार्यह आहे. संघाचे असो किंवा नसोत, हिंदू असोत किंवा नाही मात्र संघाने सांगितलेले पंच परिवर्तन करावे लागेल, हे सर्वांना पटले आहे. पंच परिवर्तन सर्वांना मान्य आहे असा आमचा अनुभव आहे.

प्रश्न – पंच परिवर्तन बद्दल मीडिया आणि Social Media कडून अपेक्षा?

आता संघाचे स्वंयसेवक ही Social Media वर जात आहे. संघाच्या प्रसिद्धी विभागाकडून ही ते काम केले जात आहे. समाज परिवर्तन ज्यांना करायचे आहे, त्यांची जबाबदारी जास्त आहे. संघटन करणे ही संघ कार्याची सुरुवात असते, संघटित झाल्यानंतर परिवर्तनासाठी काम करणे ही जबाबदारी आहे.

प्रश्न – संघ कार्य वाढवण्याबद्दल स्वयंसेवकाकडून काय अपेक्षा आहेत?

संघ स्वंयसेवकानी त्यांच्या शिस्तीने, कार्याने उदाहरण ठेवून समाजात बदल करावे अशी अपेक्षा आहे.

प्रश्न – संघाच्या भौगोलिक रचनेत बदल होतील का?

आता 86 संभाग होतील, काम मोठा झाला आहे, त्यानंतर त्याची रचना विकेंद्रित होणे आवश्यक आहे. संघाकडून अपेक्षा ही वाढल्या आहे. त्यामुळे विजय करावे लागायचे ते खालच्या स्तरावरून विकेंद्रीत स्वरूपात करायचे आणि जे नवीन करायचे आहे ते वरच्या पातळीवर निर्णय घेऊन करायचे अशी व्यवस्था राहणार आहे. प्रांत शब्द न ठेवता संभाग (विभाग) अशी रचना राहणार आहे. प्रदेश हे एकक राहील.

संघाची कार्यपद्धती बदलणार नाही, ती जशी आहे ती तशीच राहणार आहे. आम्हाला दुसरी कार्यपद्धती सापडत नाही, म्हणून आम्ही ती बदलत नाही. मैत्री करायची (जनसंपर्क), आपले उदाहरण ठेवायचे आणि काम वाढवत न्यायचे. ती अनेकांना रटाळ वाटत असली तरी सध्या तरी संघाचे काम पुढे न्यायाला दुसरी कार्यपद्धती आम्हाला सापडलेली नाही.

प्रश्न – माध्यमांमध्ये संघाच्या कामाची बाजू नीट मांडली जात नाही असा एक अनुभव आहे, तसेच अनेक वेळेला पत्रकारांना ही संघाकडून प्रतिसाद मिळत नाही असा ही अनुभव आहे. याबद्दल काय वाटते?

प्रसार माध्यमे सार्वजनिक जीवनाचा भाग आहे, म्हणून संघाला त्याचा विचार करावं लागतं. पत्रकारांनी त्यासाठी प्रचार विभागाला विचारणा करायची. कार्यालयात पत्रकारांनी प्रश्न विचारू नये. कार्यालय कडे बहुधा ती माहिती नसते. प्रचार विभाग काम करत आहे.

प्रश्न – विधाने ट्विस्ट केली जाते अशा वेळेला काय वाटते?

अशा वेळेला मला काही वाटत नाही, हसू येते, कीव ही येते. आम्हालाही त्याच्यातून अनुभव मिळते काय बोलले पाहिजे. तसही संघाला विरोध करण्यासाठी विरोधकांकडे फारसं काही नाही म्हणून विधाने ट्विस्ट करून असं केलं जात असावं.

प्रश्न – प्रतिकूलतेमध्ये संघ वाढला जनसंपर्क ही वाढला. कसं??

संघाचा लाईफ ब्लड वेगळा आहे. संघ साधनाने वाढत नाही तर कार्यकर्त्यांच्या प्रेमाने वाढतो. कार्यकर्त्यांना समाजासाठी जे करावेसे वाटते ते करतात आणि त्याच्यातून संघ वाढतो. संघावर बंदी आली, तेव्हा असं बोललं जायचं जोपर्यंत दोन माणसांचा भेटणं बंद होत नाही, तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!