इंदिरा गांधींच्या ‘हाता’ला दिलेला आशीर्वाद! हनुमान अंश, नीम करोलीनंतर आता ‘या’ रहस्यमयी बाबांची गोष्ट मोठ्या पडद्यावर येणार
नीम करोली बाबांवरील चित्रपटाच्या चर्चेनंतर आता आणखी एका रहस्यमयी बाबांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. 'मचान बाबा' असं या चित्रपटाचं नाव असून, यात त्यांच्यासंबंधित आस्था, इतिहास आणि अनेक रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सध्या संत, महात्मा आणि अध्यात्मिक जगताशी संबंधित लोकांच्या जीवनावर बनवलेले बायोपिक प्रचंड हिट ठरत आहेत. प्रेक्षकांना हे सिनेमे पाहायला आवडत असल्याने अशा प्रकारच्या सिनेमांची एक लाट आता येताना दिसत आहे. नीब करोली बाबा, हनुमान अंश या सिनेमांच्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक अध्यात्मिक जगताशी संबंधित सिनेमा येणार आहे. देशाच्या सगळ्यात रहस्यमयी बाबा म्हणून प्रचलित असलेल्या देवराहा बाबा यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाचं नाव ‘मचान बाबा’ असणार आहे. या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून टायटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा सिनेमा २०२७ पर्यंत पूर्ण होऊन सिनेमाघरांमध्ये पोहचण्याची अपेक्षा आहे.
रहस्यमयी गोष्टी चर्चेत
देवराहा बाबा यांच्याबद्दल खूप रहस्यमय आणि गूढ गोष्टी प्रचलित आहेत. ज्यामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या वयाचा आकडा. ते सुमारे ९०० वर्ष जीवन जगल्याचा दावा केला जातो. लेखक अभिजीत सेन यांच्या एका पुस्तकात अशा प्रकारचा दाव्याबद्दल तपासणी करण्यात आलेली आहे. देवराहा बाबांची खासियत म्हणजे ते नदीकिनारी बांधलेल्या एका उंच चौथऱ्यावर राहायचे. तिथूनच ते आपल्या भक्तांना भेटायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे आणि आशीर्वादही द्यायचे, असे मानले जाते
मोठ्या नेत्यांशी संबंध
दरम्यान, देवराहा बाबा यांच्याबाबत आणखीही अनेक मोठे दावे केले जातात. २००९ साली लिबरहान आयोगाच्या अहवालावरील चर्चेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी देवराहा बाबांबद्दल वक्तव्य केलं होतं. ऐतिहासिक नोंदीनुसार १९११ मध्ये जॉर्ज पंचम यांनी देवराहा बाबांची भेट घेतल्याचे नमूद असल्याचे नमूद केले. एवढच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या तत्कालिन बड्या नेत्यांचेही देवराहा बाबांशी संबंध असल्याचे सांगितलेले.
View this post on Instagram
काँग्रेसचं निवडणूक चिन्ह
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७८ साली त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांचे आशीर्वाद घेतली याच भेटीत बाबांनी त्यांना हाताचे निवडणूक चिन्ह सुचवल्याचा दावा भक्तांकडून केला जातो. दरम्यान, १९७८ ला निवडणूक आयोगाने काँग्रेसला हाताचे चिन्ह अधिकृत पक्ष चिन्ह म्हणून जाहीर केलं होतं. त्यामुळे हा केवळ योगायोग होता की यात काही तथ्य होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. १९८९ साली राजीव आणि सोनिया गांधीही देवराहा बाबांना भेटल्याची माहिती उपलब्ध आहे. याच वर्षी राजीव गांधी सरकारकडून अयोध्या पायाभरणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, हे सर्व कथित प्रसंग चित्रपटात येणार की नाही याबद्दल अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
नीम करोली बाबा अन् देवराहा बाबा हे दोघेही एकाच काळातील संत असल्याची माहिती रिसर्च करताना समोर आली आहे. नीम करोली बाबा हे देवराहा बाबांचा प्रचंड सन्मान करायचे, अशी माहिती भक्तांसोबत झालेल्या चर्चेतून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या सिनेमाची निर्मिती ही भारतीय वंशाच्या पण सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या पूनम गुप्ता आणि विकल्प पालीवाल हे करत आहेत. त्यामुळे या सिनेमाचाही आता प्रतिक्षा लागली आहे.
