प्रेग्नेंसी दरम्यान ऐश्वर्या रायला कोणी आणि का दाखवला बाहेरचा रस्ता, कशी झालेली अभिनेत्रीची अवस्था?

Aishwarya Rai: प्रग्नेंसी दरम्यान ऐश्वर्या राय हिने असं काय केलेलं ज्यामुळे तिला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, अनेकांना नाही माहिती काय आहे प्रकरण? ऐश्वर्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

प्रेग्नेंसी दरम्यान ऐश्वर्या रायला कोणी आणि का दाखवला बाहेरचा रस्ता, कशी झालेली अभिनेत्रीची अवस्था?
| Updated on: Aug 17, 2025 | 1:10 PM

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या हिने बॉलिवूड गाजवला. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्या हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ऐश्वर्या हिच्यासोबत घडलेली एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यामुळे ऐश्वर्याचं मोठं नुकसान झालं.

ऐश्वर्या हिने एक सिनेमा साईन केला होता. पण अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ऐश्वर्या हिला सिनेमातून काढल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर हिला सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्या सिनेमात ऐश्वर्या हिच्या जागी करीना हिची निवड करण्यात आली, त्या सिनेमाचं नाव ‘हिरोईन’ असं होतं.

‘हिरोईन’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला पण करीनाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. सिनेमाचं दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी केलं होतं. सांगायचं झालं तर, ‘हिरोईन’ सिनेमात ऐश्वर्या मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार होती. पण 2011 मध्ये जेव्हा ऐश्वर्या प्रेग्नेंट राहिली तेव्हा अभिनेत्रीला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यामुळे खळबळ माजली होती. कारण ऐश्वर्याने प्रेग्नेंसी लपवून ठेवली… असं मधुर भंडारकर म्हणाले.

यााबद्दल अभिनेत्री करीना कपूर हिला देखील विचारण्यात आलं. यावर करीना म्हणाली, ‘हा दिग्दर्शक आणि ऐश्वर्या यांचा खासगी प्रकरण आहे. जर तिने सिनेमात काम केलं असतं तर, ते प्रचंड हटके असतं… ऐश्वर्या इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहे…’

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘हिरोईन’ सिनेमा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला. सिनेमातील गाणी देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात करीना हिने अनेक बोल्ड सीन देखील दिले होते. ज्यामुळे अभिनेत्रीवर टीका देखील करण्यात आली…

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. त्यानंतर ऐश्वर्या फार कमी सिनेमात भूमिका साकारताना दिसली. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या फार सक्रिय नसते. पण अनेकदा अभिनेत्रीला लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण  खासगी आयुष्यामुळे काय  चर्चेत अशते.