
बॉलिवूडची सुपरस्टार धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही सर्वांची तेवढीच फेव्हरेट अभिनेत्री आहे. माधुरीचे नाव तसे अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यावर तिने कधीही भाष्य केलं नाही. असाच एक अभिनेता होता ज्याच्यासोबत तिने चित्रपट केले होते आणि त्यांची जोडी हीट ठरली होती. एवढंच नाही तर त्या अभिनेत्यासोबत तिच्या अफेअरच्या बातम्या पण येत होत्या. पण नंतर अशी एक घटना घडली ज्यामुळे तिने त्या अभिनेत्यापासून दूर राहणं पसंत केलं. तसेच एका पार्टीमध्ये जेव्हा तो अभिनेता आला हे पाहताच माधुरीने पार्टीमधून काढता पाय घेतला.
या अभिनेत्यासोबत माधुरीच्या डेटींगच्या चर्चा होत्या
हा अभिनेता म्हणजे संजय दत्त. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या डेटिंगबद्दल चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा होती. पण नंतर, त्यांच्यातील अंतर इतके वाढले की माधुरीने त्याच्यासोबत फोटो काढणे देखील टाळले होते.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्याच्या अटकेला विरोध केला, परंतु माधुरी दीक्षित यात कुठेच नव्हती. संजयची जामिनावर सुटका झाल्यावर , महानता चित्रपटाचे दिग्दर्शक अफजल खान यांनी एक भव्य पार्टी आयोजित केली होती आणि माधुरीने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते.
पार्टीत माधुरी अस्वस्थ होती
ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट इतिहासकार हनीफ झवेरी यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्या पार्टीची कहाणी सांगितली. ते म्हणाले, “एका बाजूला एक स्टेज होता आणि दुसऱ्या बाजूला खुर्च्या असलेले टेबल होते. माधुरी तिच्या सेक्रेटरी आणि इतर काही लोकांसह आत आली, पण स्टेजकडे जाण्याऐवजी ती माझ्या शेजारी येऊन बसली. मी पाहिले की ती फारच अस्वस्थ दिसत होती आणि तिला वाटले की ती अखेर कलाकारांमध्ये सामील होईल.”
तिला पार्टीत त्या अभिनेत्यासोबत फोटो काढायचे नव्हते
झवेरी पुढे म्हणाले, “संजय दत्तसोबत न बोलता , न फोटो काढता माधुरी दीक्षित आणि तिची टीम उठून निघून गेली. सर्व छायाचित्रकार माधुरी आणि संजयच्या पहिल्या फोटोची वाट पाहत होते. ती का गेली हे मला माहित होते. तिला संजयसोबत फोटो काढायचे नव्हते.” असं म्हणत त्यांनी माधुरीची त्या पार्टीतील संजयला पाहिल्यानंतरची अस्वस्थता दिसत होती.
माधुरीच्या घरच्यांचाही होता विरोध
हनीफ झवेरी यांनी स्पष्ट केले की माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबाला संजयच्या कायदेशीर बाबींची छाननी करायची नव्हती. माधुरीच्या आईला तिने स्थायिक व्हावं असं वाटत होतं. आणि या सर्व प्रकारापासून दूरच असावं असं वाटत होतं. शेवटी तिला संजय दत्तपासून लांब राण्याची तंबी तिच्या घरच्यांनी दिली होती. अखेर 1999 मध्ये, तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले.