AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा रोजचा मेकअप कसा असतो? तुम्हीही ट्राय करु शकता, पाहा व्हिडीओ

मोठ्या पडद्यावर तर माधुरी सुंदर दिसतेच पण रियल लाईमध्येही तिच्या सुंदरतेला तोड नाही. जेव्हा ती कुठल्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त नसते तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनेलवर ब्यूटीशी निगडित अनेक गोष्टी सांगत असते.

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा रोजचा मेकअप कसा असतो? तुम्हीही ट्राय करु शकता, पाहा व्हिडीओ
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 01, 2021 | 10:59 PM
Share

मुंबई : माधुरी दीक्षितची घायाळ करणारी सुंदरता, तिचं गोड हसू आणि सदाबहार अभिनयाशी प्रत्येकजण परिचित आहे. माधुरी ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कायम पहिल्या पाचमध्ये राहिली असेल. मोठ्या पडद्यावर तर माधुरी सुंदर दिसतेच पण रियल लाईमध्येही तिच्या सुंदरतेला तोड नाही. जेव्हा ती कुठल्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त नसते तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनेलवर ब्यूटीशी निगडित अनेक गोष्टी सांगत असते. तसंच मेकपशी संबंधित एखादा व्हिडीओ ती हमखास शेअर करत असते. (Special beauty tips for your female fans of Bollywood actress Madhuri Dixit)

माधुरी दीक्षितच्या ब्यूटी टिप्स

माधुरीने आपल्या रुटीन मेकअपचा एक व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला आहे. हा मेकअप खूप साधा आणि सोपा आहे, जो तुम्ही तुमच्या घरीही ट्राय करु शकता. माधुरीने आपल्या व्हिडीओमध्ये या मेकअपशी संबंधित अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपल्या चाहत्यांना सांगितल्या आहेत. या व्हिडीओमध्ये माधुरीने पहिली स्टेप सांगताना पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावायला सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मेकअप खूप चांगल्या पद्धतीने बसतो.

माधुरीने पहिली टिप्स दिली आहे की सुरुवातीला आपल्या चेहऱ्याच्या स्टोकवर मॉइश्चराइजर लावा. त्यानंतर अंडरआय एरिया मॉइश्चराइज करा. असं केल्याने तुमच्या स्किनची पफीनेस आणि डाइर्डनेस दूर होईल. टिप नंबर 2 मध्ये माधुरी सांगते की, जर एखाद्याला स्किन एलर्जी असेल तर तुम्ही वापरत असलेलं प्रॉडक्ट एकदा नक्की पाहा. दोन मिनिटे वाट पाहिल्यानंतर माधुरीने बेस करायला सुरुवात केली.

मेकअप करताना तो हलक्या स्वरुपाचाच करा, असा सल्ला माधुरीने दिला आहे. तिने सर्वात आधी ब्रशने कंसीलर आपल्या अंडरआयवर अप्लाय केला आणि त्यानंतर तो चांगल्यारितीने मिक्स केला. त्यानंतर माधुरीने फाऊंडेशन आपला चेहरा आणि गळ्यावर लावलं. या स्टेपनंतर तिने ट्रांसल्यूसेंट पाउडर आपला चेहरा आणि गळ्यावर लावली. ज्याद्वारे बेस चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकेल.

पुढील स्टेपमध्ये माधुरीने आपल्या आईब्रोजला ब्रश केलं ज्यामुळे ते थोडे थिकर वाटतील. आयशॅडोसाठी माधुरीने डार्क कलरचा वापर केला. ज्यामुळे तिचा नॅचरल लूक अधिक स्पष्टपणे दिसेल. शेवटी तिने आपल्या आयलॅशेजला कर्ल केलं आणि मस्करा लावला. त्यानंतर तिने थोडा ब्लश आपल्या गालांवर लावला आणि त्यासह न्यूज लिपस्टिक कॅरी केली ज्यामुळे लुक परफेक्ट दिसेल. शेवटी माधुरीने सांगितलं की लिपस्टिक लावल्यानंतर तुमचे दात एकदा नक्की तपासा.

इतर बातम्या :

दिया मिर्झा वैभव रेखीपासून पहिल्यांदाच होणार आई, मालदिवहून बेबी बंपचे फोटो पोस्ट

Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा बोल्ड अंदाज, लोक म्हणाले ‘गाडीवाला आया घर से कचरा निकाल’

Special beauty tips for your female fans of Bollywood actress Madhuri Dixit

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली