माधुरी दीक्षितच्या डॉक्टर नवऱ्याने 21 किलो वजन कसं घटवलं ? श्रीराम नेनेंनी शेअर केलं टॉप सीक्रेट
माधुरी दीक्षितचे पती, डॉ. श्रीराम नेने यांनी 21 किलो वजन कमी करून सर्वांनांच आश्चर्याचा धक्का दिला. स्वत:च्या फिटनेसला चांगले मार्क देणाऱ्याडॉ.नेने यांनी त्यांच्या नव्या पुसत्करात वजन कमी करण्याचं सीक्रेट शेअर केलंय.

हॉलिवूडची धक धक गर्ल सध्या मराठीत दिसत्ये आणि तेही छोट्या पडद्यावर. ‘कोण होणार करोडपति’ या मराठी क्विझ रिॲलिटी शोची होस्ट म्हणून माधुरी सध्या दिसत असून नुकतीच तिच्या या शोला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे, तर दुसरीकडे तिचे पती, डॉ . श्रीराम नेने हे त्यांच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 21 Days to Good Health! – असं त्यांच्या या नव्या पुस्तकाचं नाव आहे. तंदुरुस्त आणि चांगलं, आरोग्यदायी आयुष्य़ कसं जगावं ?हे त्यांनी यात सांगितलं आहे. तसेच आपल्या काही चुकीच्या सवयी या भविष्यात आपल्या आरोग्यासाठ कशी धोकादायक ठरू शकतात, हेही नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणज, डॉ. नेने यांनी फक्त हे पुस्तक लिहीलेलं माही, तर त्यानी स्वत:चही वजन कमी केलंय.
काय म्हणाले डॉ. नेने ?
एका वृत्तपत्राशी बोलताना डॉ. नेने म्हणाले, “ मी एक हार्ट सर्जन म्हणून काम करतो. माझ्या कारकिर्दीत मी अनेक रुग्णांना रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना पाहिले आहे. अवघ्या काही मिली सेकंदांच्या फरकाने आम्ही अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. मात्र, अशी परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे – आपण गेली 20-30 वर्षे कसे जगलोत. आपण काय सवयी अंगिकारल्या, याला महत्व असतं. म्हणूनच एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा, आजार होण्यापूर्वीच लोकांना चांगल्या, हेल्दी सवयीचं महत्व पटवून देणं अधिक गरजेचं आहे” असं ते म्हणाले.
नवीन सवयी अंगीकारण्याबाबत डॉ. नेने पुढे म्हणतात, “ एखाद्या नव्या परिस्थितीशी किंवा सवयीशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला साधारणपणे 21 दिवस लागतात, असं मत १९६० च्या दशकात प्लास्टिक सर्जन मॅक्सवेल माल्ट्झ यांनी मांडलं होतं. पण आता काळानुसार या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज जर आपल्याला एखादी नवीन संवय अंगिकारायची असेल, तर ती आपल्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी आता 56 ते 66 दिवसांच कालावधी लागू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, त्यात सातत्य असणं अत्यंत गरजेच आहे” असं पुढे डॉ. नेने यांनी नमूद केलं.
निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. श्रीराम नेने म्हणाले की, उत्तम आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर 5 गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, तणावाचे योग्य व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक दृष्टिकोन, तसेच सामाजिक संबंध व जीवनातील उद्देश यांचा समावेश आहे. “निरोगी आरोग्याचे हे पाच आधारस्तंभ प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत. दैनंदिन जीवनात या गोष्टींचे महत्त्व समजून घेऊन त्यानुसार बदल केले, तर आरोग्यामध्ये आणि एकूणच जीवनशैलीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येऊ शकते.” असं ते पुढे म्हणाले.
View this post on Instagram
डॉ. नेने यांचं वेट लॉस सीक्रेट काय?
सध्या सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असते. मात्र त्यातली सगळीच माहिती विश्वासार्ह असतेच असं नाही. म्हणूनच याबाबत सावधगिरी बाळगा, असा सल्ला डॉ. नेने यांनी दिला. “सोशल मीडियावर आरोग्याविषयी अनेक दावे केले जातात. विशेषतः कोरोनाच्या काळात अनेक जण स्वतःला आरोग्यतज्ज्ञ समजू लागले होते. त्यामुळे कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या माहितीवर ठोस पुरावे तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नये. त्याचप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI कडून मिळणाऱ्या माहितीचीही सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असते.” असं ते म्हणाले.
भारतातील बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींविषयी बोलताना डॉ. नेने यांनी सांगितलं की, फक्त 1 तास व्यायाम करून चालत नाही, तर ज्याला वजन कमी करायचं आहे, त्याने दिवसभर ॲक्टिव्ह राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप, मानसिक शांतता आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन यांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच मोबाईल, ओटीटी आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे.
डॉ. श्रीराम नेने यांच्या ‘21 Days to Good Health’ या पुस्तकात निरोगी सवयी टप्प्याटप्प्याने अंगीकारण्यावर भर देण्यात आला आहे. याबाबत ते सांगतात, “ 21 दिवस म्हणजे केवळ सुरुवात आहे. लोकांनी दीर्घकाळ निरोगी सवयी जोपासाव्यात, आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहावे आणि शक्य तितक्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करावेत, हेच माझे ध्येय आहे”. “आपण बँकेत आणि शेअर बाजारात बरीच गुंतवणूक करतो; पण स्वतःच्या आरोग्यासाठी किती लोकं गुंतवणूक करतात ? फक्त दीर्घायुषी होणं हे महत्वाचं नाही, तर निरोगी जगणं हेही तितकचं महत्त्वाचं आहे” असं ते म्हणाले.
