AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववधूच्या एंट्रीला हमखास वाजतं.. माधुरी दीक्षितचं 33 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही हिट; रामायणवरून सुचली पिक्चरची कथा

माधुरी दीक्षितचा 'खलनायक' चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. 1993 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट संजय दत्त आणि माधुरीच्या अभिनयाने गाजला. त्यातील 'पालखी में होके सवार' हे गाणं आजही वधूच्या एंट्रीसाठी पसंत केलं जातं.

नववधूच्या एंट्रीला हमखास वाजतं.. माधुरी दीक्षितचं 33 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही हिट; रामायणवरून सुचली पिक्चरची कथा
माधुरीचं हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय
| Updated on: Aug 07, 2026 | 12:37 PM
Share

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. दमदार अभिनय आणि अप्रतिम नृत्यशैलीच्या जोरावर तिने गेली चार दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. चिते अनेक चित्रपचट आजही आवर्जून पाहिले जातात, पण 1993 साली आलेला तिचा एक चित्रपट आजही तितकाच प्रसिद्ध असून त्यातली गाणीही खूप फेमस आहेत. जवळपास तीन दशकांपूर्वी आलेला माधुरीचा फेमस चित्रपट म्हणज ‘खलनायक’. माधुरी, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफची प्रमुख भूमिका असलेल्या सुपरहिट खलनायक चित्रपटाची कथा थेट रामायणातून प्रेरित होती, हे तर अनेकांना माहीतही नसेल. तशी तर या पि्चरची सगळीच गाणी फेमस आहेत, पण “पालखी में होके सवार चली रे” हे विशेष गाणं आजही लग्नसमारंभांमध्ये, विशेषतः वधूच्या एंट्रीसाठी हमखास वापलं जातं. कित्येकांचं ते आजही फेव्हरिट आहे.

आजही तितकंच लोकप्रिय ‘पालखी में होके सवार…’

“कोई रोक सके तो रोक ले… मैं नाचती छन छन, छन छन छन… पालकी में होके सवार चली रे… मैं तो अपने साजन के द्वार चली रे…”

अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे गाणं संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गीतकार आनंद बक्षी यांच्या लेखणूतून उतरलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिलं. ९०च्या दशकात लग्नांमध्ये या गाण्याची प्रचंड लोकप्रियता होती आणि आजही ब्राइडल एंट्रीसाठी हे गाणे अनेकांची पहिली पसंती असतं.

रामायणावरून सुचली ‘खलनायक’ची कथा

चित्रपटाच्या प्रदर्शनाला 33 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिग्दर्शक सुभाष घई यांनी खलनायकच्या कथेमागील प्रेरणा उलगडली होती. “रावणासारख्या व्यक्तीच्या मनात परिवर्तन होऊन तो श्रीरामाच्या मार्गावर चालू शकतो का?” या विचारातूनच खलनायकची कथा आकाराला आली, असं ते म्हणाले होते. हा चित्रपट केवळ एका खलनायकाची गोष्ट नव्हती, तर परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या एका माणसाच्या अंतर्गत संघर्षाची कहाणी होती. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आजही तितकाच ताजा असल्याचे घई यांनी नमूद केलं होतं.

बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरहिट

1993 मध्ये प्रदर्शित झालेला खलनायक हा त्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक होता. संजय दत्त याने ‘बल्लू बलराम’ उर्फ ‘खलनायक’ची भूमिका साकारली होती, तर जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. त्याचबरोबर “नायक नहीं खलनायक हूँ मैं”, “चोली के पीछे क्या है”, “पालखी में होके सवार चली रे” आणि “ऐ साहब ये ठीक नहीं” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या मनात आणि ओठांवर कायम आहेत.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद