Deepali Sayyad : “मला चिंचोके दाखवले, बाटलीतून पाणी दिलं, अन्…”, दिपाली सय्यद यांचा अशोक खरातबद्दल मोठा खुलासा!
Deepali Sayyad : अभिनेत्री दिपाली सय्यद सध्या 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल' सिनेमांमुळे चर्चेत आहे. सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली असून सिनेमा भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आधारित आहे. तर एका मुलाखतीत दिपाली सय्यद यांनी अशोक खरात यांच्या भेटीबद्दल सांगितलं आहे.

Deepali Sayyad : भोंदूबाबा अशोक घरात याचे काळे कृत्य समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. अनेक महिलांनी पुढे येत अशोक खरात याने केलेल्या लैंगिक छळाची कबुली दिली. शिवाय भोंदूबाबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले. एवढंच नाही तर, यामध्ये अनेक राजकीय मंडळींची नावे देखील समोर आली. आता अशोक खरात याच्या काळ्या कामांवर आधारित सिनेमा ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ देखील प्रदर्शित होत आहे. आज सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण सतत होत असलेल्या विरोधामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिपाली सय्यद यांनी अशोक खरात याच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. दिपाली सय्यद यांनी सांगितल्यानुसार, ‘मी अशोक खरात याला एकदा भेटले होते. पण तेव्हा मला त्याचं नाव देखील माहिती नव्हतं… दोनवर्षांपूर्वा तो माझ्या मुंबईतील ऑफिसमध्ये आलेला. माझे काही कार्यकर्ते त्याला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आलेले… त्याने क्रिम रंगाची सफारी घातलेली आणि त्याने मला राजकीय सल्ला दिलेला.’
‘राजकारणात तुझं काहीतरी चांगलं होईल, तुला पद वगैरै मिळेल.., खूप मोठी होशील… असं देखील त्याने सांगितलेलं… त्याने मला पूजा करायला सांगितली. मला चिंचोके दाखवले आणि बॉटेलमध्ये पाणी दिलं. ते दिल्यानंतर म्हणाला पूजा करावी लागले… पूजा केल्यानंतर तुझं चांगलं होईल..’ असं देखील तो मला म्हणालेला
‘मी त्याच्याकडे पाहिलं आणि ओके म्हटलं… आमच्याकडे जेव्हा अशी माणसं येतात. गुरु वैगरे म्हणून, तेव्हा त्यांना असं हडतूड करु शकत नाही. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना म्हणाले, कशा लोकांना घेऊन येता…’, असं देखील दिपाली सय्यद म्हणाल्या.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिपाली सय्यद यांची चर्चा सुरु आहे.
‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेते मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार असून दिपाली सय्यद यांच्यासोबत उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, भरत गणेशपुरे, माधुरी पवार, अंजलि जोगळेकर, राहुल बेलापूरकर, श्रेया कुलकर्णी, अनिल नागरकर, महिमा नागमोती, रूपाली पठारे, प्रणव पवार, सुरेश विश्वकर्मा, शिवराज वालवेकर, आणि सिद्धेश्वर झाडबुके यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.