AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule: नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, संजय राऊतांच्या मागणीवर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार, म्हणाले काय?

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut: दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरून काल वाद उफाळला. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करण्याची मागणी केली. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा जोरदार पलटवार केला.

Chandrashekhar Bawankule: नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, संजय राऊतांच्या मागणीवर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार, म्हणाले काय?
नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, बावनकुळे यांचा जोरदार पलटवार
| Updated on: Nov 20, 2026 | 1:26 PM
Share

Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut: दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरून काल वाद उफळल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठी मागणी केली. नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा जोरदार पालटवार केला. तर यासोबतच इंदू मिल स्मारकाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. खर्च वाढला तरी निधी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

भटक्या समाजाच्या वस्त्यांसाठी विशेष शिबिरं

राज्य सरकारच्या माध्यमातून राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. ७ आणि ८ जानेवारी रोजी या अभियानांतर्गत भटक्या समाजाच्या वस्त्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जातील. जन्माचे दाखले, घरांचे कागदपत्र आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली असून, लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान पुढे नेले जाणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

फासेपारधी समाजाला लाभ

फासेपारधी समाजासाठी गावठाणे गठित करणे, तांड्यांना ग्रामपंचायतीचे अधिकार देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि रोजगारनिर्मितीसाठी साधने उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली आहे. या समाजाच्या विकासासाठी शासन सकारात्मक असून, विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्र्‍यांनी दिली.

दीक्षाभूमी नामांतराबाबत संजय राऊतांवर पलटवार

नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. नागपुरात येणारा प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देतो. दीक्षाभूमीच्या नावानेच नागपूरची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. संजय राऊत काय सांगतात, यापेक्षा दीक्षाभूमीचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत आहे, असा पलटवार बावनकुळे यांनी केला.

इंदू मिल स्मारकाविषयी मोठी माहिती

प्रकल्पाची किंमत वाढली असली, तरी राज्य सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. इंदू मिलमधील स्मारकाचा संपूर्ण प्रकल्प आमचे सरकार पूर्ण करणार आहे. काही काळ साहित्य उपलब्ध न झाल्यामुळे कामाला विलंब झाला. मात्र, आता उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...