नोटांनी भरलेली कारची डिक्की, कापलेली अनामिका आणि…, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा दुसरा टीझर प्रदर्शित
Maharashtra Epstein Files Movie Teaser: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची (Ashok Kharat Case) पोलखोल करणारा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये नोटांनी भरलेली कारची डिक्की, कापलेली अनामिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Maharashtra Epstein Files Movie Teaser: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर (Ashok Kharat Case) आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या नव्या मराठी सिनेमाची (Marathi Movie) चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलेला. आता सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगली आहे. ‘कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार…?’, असं कॅप्शन लिहित सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे…
टीझरची सुरुवात एका महिलेच्या अंगात आल्याचं दृश्य दिसत आहे. तर अभिनेत्री दिपीली सय्यद यांची एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर टीझरमध्ये कारची डिक्की पैशांनी भरलेली दिसत आहे. तर लक्ष वेधून घेणारा सीन म्हणजे अभिनेत्रीने मंदिरात बसून कापलेली स्वतःची अनामिका…., तर या सिनेमातून स्पष्ट होईल अशोक खरात याच्याकडे खरंच दैवी शक्ती होती की नव्हती… टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर सिनेमा 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सिनेमाबद्दल दिपाली सय्यद यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दिपाली म्हणालेल्या, ‘ आता टीचर लॉन्च झाला आहे, सगळ्यांनी बघितला आणि लोक त्याला खूप प्रतिसाद चांगला देत आहेत. दोन ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहेत. हा एक वेगळा आणि रियल सब्जेक्ट आहे. या चित्रपटात बरेच कलाकार आहेत. स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत सगळं येईल. प्रत्येक नेत्यांचा यामध्ये रोल आहे.’
दिपाली सय्यद यांना मिळालेली धमकी…
सिनेमाची शुटिंग सुरु असताना दिपाली सय्यद यांनी धमकी आलेली. यावर त्या म्हणालेल्या, ‘धमक्या आता थांबल्या आहेत. पुन्हा फोन आला तर, तक्रार दाखल करेल.. असं ठरवलं होतं… आता शुटिंगच्या सेटवर गार्ड ठेवले आहेत…’ असं देखील दिपाली सय्यद म्हणालेल्या. सिनेमाचा काही भाग महाराष्ट्राच्या राजकारणा भोवती फिरत आहे.
