AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे यांचं गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे धमाल पुजाऱ्याच्या भूमिकेत

'अबब! विठोबा बोलू लागला' हे बालनाट्य नव्या संचात नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांच्या भूमिका असलेलं हे नाटक त्याकाळी खूप गाजलं होतं. आता त्यात प्रभाकर मोरे भूमिका साकारणार आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे यांचं गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे धमाल पुजाऱ्याच्या भूमिकेत
‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2025 | 7:54 PM
Share

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं रंगभूमीवर पुन्हा अवतरली. या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमीसुद्धा मागे नाही. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे. २ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे.

पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केलं आहे. हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवलं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे हे धम्माल पुजारी साकारणार आहेत. त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसंच बालकलाकार आयुष टेंबे, किनारा पाटील, गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करीत असून या नाटकाचं पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना आणि पालकांना आपल्या संस्कार आणि संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारं हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.

एकीकडे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहण्यासाठी नाट्यरसिक उत्सुक असतानाच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची सध्या जबरदस्त इनिंग सुरू असल्याचं पहायला मिळतंय. हास्यजत्रेच्या कार्यक्रमातून ते प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहेत. त्याचसोबत एकामागोमागून एक त्यांचे इतर प्रोजेक्ट्सही सुरू आहेत. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील प्रभाकर मोरे आणि धनश्री काडगांवकर यांच्यावर चित्रित झालेलं ‘शालू झोका देगो मैना’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...