Krishna: महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडील कृष्णा यांचं निधन

| Updated on: Nov 15, 2022 | 8:34 AM

साऊथ सुपरस्टार कृष्णा काळाच्या पडद्याआड; महेश बाबूला पितृशोक

Krishna: महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडील कृष्णा यांचं निधन
अभिनेते कृष्णा, महेश बाबू
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं आज (मंगळवार) निधन झालं. पहाटे 4 वाजता हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक अरेस्टमुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 80 वर्षांचे होते. सोमवारी मध्यरात्री कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

रुग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर तातडीने CPR करण्यात आला आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आलं, असं डॉक्टर म्हणाले. सोमवारपासूनच कृष्णा यांची प्रकृती गंभीर होती. ते व्हेंटिलेवर होते.

कृष्ण यांचं खरं नाव घट्टमनेनी शिवा राम कृष्णमूर्ती असं आहे. त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कृष्णा हे त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. 2009 त्यांना पद्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

कृष्णा हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील होते. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार झाले. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडलं.

काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. इंदिरा देवी या कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांनी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून कृष्णा हे इंडस्ट्रीपासून दूर आहेत. कोणत्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांनी आपले प्राण गमावले. दीर्घ आजारानंतर 8 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं.