‘रणबीर कपूर जगातील सर्वांत…’, जावयाबद्दल असं काय म्हणाले महेश भट्ट?

Ranbir Kapoor : 'रणबीर कपूर जगातील सर्वांत...', पतीबद्दल आलिया भट्ट हिला नक्की वाटतं तरी काय? महेश भट्ट यांच्याकडून मोठा खुलासा... महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... जावयाबद्दल असं का म्हणाले महेश भट्ट?

रणबीर कपूर जगातील सर्वांत..., जावयाबद्दल असं काय म्हणाले महेश भट्ट?
| Updated on: Nov 27, 2023 | 10:01 AM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘एनिमल’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता नुकताच ‘इंडियन आइडल 2023’ शोमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यासोबत पोहोचला होता. तेव्हा रणबीर याला मोठं गिफ्ट मिळतं. मिळालेलं गिफ्ट पाहून रणबीर कपूर भावुक झाला. यासाठी रणबीर याने ‘इंडियन आइडल 2023’ शोचे आभार मानले. ‘इंडियन आइडल 2023’ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये महेश भट्ट म्हणाले, ‘आलिया हिला मी एक चमत्कार मानतो. ती म्हणते रणबीर जगातील सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. पण मी रणबीर याला जगातील सर्वात उत्तम बाप मानतो.. जेव्हा रणबीर राहा हिला पाहातो… तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहाण्यासारखे असतात. नीतू जी म्हणतात असं प्रेमे तर एक आई तिच्या मुलीवर करते… रणबीर माझा जावई आहे… यावर मला गर्व वाटतो… ‘

 

 

महेश भट्ट यांनी कौतुक केल्यानंतर रणबीर झाला भावुक

महेश भट्ट यांनी कौतुक केल्यानंतर रणबीर कपूर भावुक झाला आणि म्हणाला, ‘त्यांनी कधीच माझ्या समोर माझं कौतुक केलं नाही.. असं सासरे भेटल्यामुळे मी स्वतःला धन्य मानतो…’ महेश भट्ट यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अभिनेत्याने ‘इंडियन आइडल 2023’ शोचे आभार देखील मानले.

रणबीर – आलिया यांचं लग्न आणि लेक राहा

रणबीरने एप्रिल 2022 मध्ये आलिया भट्टसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर आलिया हिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. 6 नोव्हेंबर रोजी आलिया हिने गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाआधी आलिया आणि रणबीर काही काळ एकमेकांना डेट करत होते.

रणबीर – रश्मिका स्टारर ‘अॅनिमल’ सिनेमा

‘अॅनिमल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर स्टारर सिनेमा 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे.