‘पोटगीसाठी सर्वकाही सुरु…’, बिग बींनी लेकीला दिला बंगला, अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण?

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिला पोटगी द्यावी लागेल म्हणून अमिताभ बच्चन यांनी घेतला निर्णय? अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण? बच्चन कुटुंब गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत... सोशल मीडियावर फक्त अभिषेक - ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा..

'पोटगीसाठी सर्वकाही सुरु...', बिग बींनी लेकीला दिला बंगला, अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण?
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 8:59 AM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता नंदा हिच्या नावावर ‘प्रतीक्षा’ बंगला केला आहे. ज्यामुळे सर्वत्र तुफान चर्चा रंगल्या आहे. एकीकडे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे बिग बी यांनी लेक श्वेता नंदा हिच्या नावावर ‘प्रतीक्षा’ बंगला केला आहे.. दरम्यान, ‘ऐश्वर्या हिने घटस्फोट घेतल्यास पोटगीसाठी सर्वकाही सुरु आहे…’ असं नेटकरी म्हणत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला…

‘प्रतीक्षा’ बंगल्यात बिग बी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला त्यांची मुलगी श्वेता हिला भेट म्हणून दिला आहे. बंगला लेकीच्या नावावर करण्यासाठी बिग बी यांनी 50.65 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील जुहू येथे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपये आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. संपत्तीची वाटणी दोन्ही मुलांमध्ये करेल… असं बिग बी म्हणाले होते. अमिताभ बच्चन यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे.

हे सुद्धा वाचा

अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्यावर नेटकरी म्हणतात…

ऐश्वर्याने अभिषेकपासून घटस्फोट घेऊन पोटगी मागेल, म्हणून बिग बी त्यांच्या संपत्तीची वाटणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘घटस्फोट झाला ती ऐश्वर्या काहीही घेणार नाही.’ रंगणाऱ्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांच्याशिवाय बच्चन कुटुंबातील सदस्यांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

सोशल मीडियावर कायम ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट होत असतात.ऐश्वर्या देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण ऐश्वर्या आता पती अभिषेक याच्यासोबत एकही फोटो पोस्ट करत नाही. आराध्या हिच्या वाढदिवसासाठी देखील अभिनेत्रीने स्वतःसोबत लेकीचा फोटो पोस्ट केला होता.

ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.