ब्रिटिशांचे तळवे चाटणाऱ्या लोकांना पाकिस्तानात…, श्रीमंत कुंटुंबाबद्दल इतक्या वर्षांनी असं का म्हणाला अभिनेता?

भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत होते आणि हे..., श्रीमंत कुटुंबाबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, 'ब्रिटिशांचे तळवे चाटणाऱ्या लोकांना पाकिस्तानात...', अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल

ब्रिटिशांचे तळवे चाटणाऱ्या लोकांना पाकिस्तानात..., श्रीमंत कुंटुंबाबद्दल इतक्या वर्षांनी असं का म्हणाला अभिनेता?
फाईल फोटो
| Updated on: Jul 07, 2025 | 8:39 AM

भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत होते आणि हे स्वतःच्या आनंदासाठी ब्रिटिशांचे तळवे चाटत होते… असं वक्तव्य अभिनेता केआरके याने अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांसाठी केलं आहे. सांगायचं झालं तर सैफ अली खान याची वडिलोपार्जित संपत्ती भोपाळ याठिकाणी देखील असून गेल्या अनेक वर्षांपासून संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. ज्यावर मध्य प्रदेश हाय कोर्टाने निकाल सुनावलेला आहे. कोर्टाने ट्रायल कोर्टाचे आदेश फेटाळले आहेत. ज्यामध्ये सैफ अली खान, सोहा अली खान, सबा अली खान आणि शर्मिला टागोल यांना नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसांच्या अपीलानुसार, मालमत्ता वारसा हक्काने मिळालेली मानली गेली.

हाय कोर्टाने ट्रायल कोर्टाला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करून वर्षभरात ती पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्याने या प्रकरणाबाबत सैफवर निशाणा साधला आहे आणि या लोकांना पाकिस्तानात पाठवावं असं म्हटले आहे.

 

 

सैफ अली खान याच्यावर निशाणा साधणारा केआरके कायम त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यापूर्वी देखील केआरके याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची पोलखोल केली आहे. अशात केआरकेने सैफच्या वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एमपी हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं आणि त्याला पाकिस्तानला पाठवा… असं वक्तव्य केलं.

केआरके एक्सवर एक पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘कोर्टाने योग्य निर्णाय सुनावलेला आहे. सर्व पतौडी आणि सिंधिया ट्रेटर्स होते. स्वतःचं आयुष्य आनंदाने जगण्सासाठी ते ब्रिटिशांचे तळवे चाटायचे… तर अन्य भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत होते. मी तर म्हणतो अशा लोकांना पाकिस्तानात पाठवा…’ केआरकेच्या वक्तव्याने अनेक नेटकरी पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

सैफ अली खान याची संपत्ती

सैफ अली खान फक्त अभिनेता नाहीय. तो नवाबांच्या कुटुंबातून येतो. सैफकडे शानदार पटौदी पॅलेस आणि दुसरं भोपाळमध्ये वडिलोपार्जित घर आहे. त्याच्याकडे 5 हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण तो ही संपत्ती आपली चार मुलं सारा, इब्राहिम, तैमूर आणि जेहच्या नावावर करु शकत नाही.

माडिया रिपोर्ट्सनुसार सैफची नेटवर्थ 5 हजार कोटी रुपये आहे. त्याच्या स्वत:च्या नावावर 1300 कोटीची संपत्ती आहे. त्याच्या कमाईचा बहुतांश हिस्सा चित्रपट, ब्रांड एंडोरसमेंट, गुंतवणूक आणि बिझनेसमधून येतो. सैफ आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे.