अंगावर काटा आणणारा ‘माझी प्रारतना’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा' हा चित्रपट येत्या 9 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत. तर उपेंद्र लिमयेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

अंगावर काटा आणणारा माझी प्रारतना चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
Majhi Prarthana teaser
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 30, 2025 | 2:09 PM

प्रेम म्हणजे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला. पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेम कथा येत्या 9 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित ‘माझी प्रारतना’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, प्रेमातील विश्वासघात आणि त्या बिकट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या टीझरमध्ये पहायला मिळतेय. ‘माझी प्रारतना’ या चित्रपटात ब्रिटिश काळात, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीतप्रधान प्रेमकथा दाखवली आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रेमात मात्र जीवनात सर्वकाही जिंकण्याची ताकद असते, असा संदेश यात पहायला मिळतोय.

या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्याचसोबतच मराठी सिनेसृष्टीतील इतरही काही उत्कृष्ट कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. एस. आर. एम. फिल्म स्कूल प्रस्तुत ‘माझी प्रारतना” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे. पद्माराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वजित सी. टी. यांनी संगीत दिलंय. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये कथेविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

पहा ट्रेलर-

प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ हा नवा मराठी चित्रपट प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे. जीवनात कितीही दुःखं असली तरी प्रेम हेच अंतिम सत्य असतं आणि प्रेमातच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे, हे सांगणारा आणि मन हेलावून टाकणारा प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पहायला मिळणार आहे.