AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम, वेदना…अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!

पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित "माझी प्रारतना" हा मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेम आणि जिद्दीचा प्रवास दाखवतो. उत्कृष्ट अभिनय, संगीत आणि कथानक यामुळे ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 9 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रेम, वेदना...अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित माझी प्रारतना चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
Majhi Prarthana Trailer,Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2025 | 6:27 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे आणि आज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा उत्कृष्ट ट्रेलर आहे.

प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत तेव्हा…

ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा ट्रेलर आहे ज्यात सुदंर चित्रीकरण,उत्कृष्ट अभिनय, मधुर संगीत आणि इमोशन्स आपण पाहू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कथेबाबतची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. कथेमधील रहस्य आणि कहाणी नक्की कशी असणार आहे हे येत्या ९ मे ला समजेलच.

ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित 

‘माझी प्रारतना’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत.

चित्रपट 9 मे 2025 चित्रपटगृहात प्रदर्शित 

एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत “माझी प्रारतना” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. “माझी प्रारतना” हा सिनेमा 9 मे 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.