Dhurandhar : धुरंधरसाठी मेजर गौरव आर्या उतरले मैदानात, थेट पाकिस्तानला भिडले, लायकी दाखवली, VIDEO

Dhurandhar : सध्या धुरंधर चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. भारतीय धुरंधर विरोधात काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. शेजारच्या पाकिस्तानचा या चित्रपटामुळे नुसता जळफळाट होतोय. तिथे बरच काही सुरु आहे. या सगळ्याचा मेजर गौरव आर्या यांनी आपल्या स्टाइलमध्ये समाचार घेतला आहे.

Dhurandhar : धुरंधरसाठी मेजर गौरव आर्या उतरले मैदानात, थेट पाकिस्तानला भिडले, लायकी दाखवली, VIDEO
Major gaurav arya - Ranveer Singh
| Updated on: Dec 13, 2025 | 4:01 PM

सध्या देशभरात धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. रोज या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वेगाने वाढत आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं कथानक उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरतोय. पण या चित्रपटाची शेजारच्या पाकिस्तानात सुद्धा चर्चा आहे. तिथे अनेकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. टीका केली आहे. कारण यात पाकिस्तानला मार खाताना दाखवलय. त्याचवेळी धुरंधर चित्रपटावर सहा अरब देशात बंदी घालण्यात आल्यामुळे काही पाकिस्तानी आनंदात आहेत. त्यांना आपला हा विजय वाटतोय. बहरीन, कुवैत, ओमान, कतर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) या 6 देशांमध्ये धुरंधर चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे पाकिस्तानी खुशीत आहेत. या चित्रपटाविरोधात बडबड करत आहेत. आता मेजर गौरव आर्या धुरंधर चित्रपटासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी पाकिस्तानला खूप सुनावलं आहे. पाकिस्तानला आपल्या शब्दांनी फोडून काढलय. मेजर गौरव आर्या हे भारत-पाकिस्तान विषयातील तज्ज्ञ असून ते नेहमीच वेगवेगळ्या मंचावर भारताची बाजू प्रखरपणे मांडत असतात. आता धुरंधरच्या बाबतीतही त्यांनी तेच केलय. धुरंधर फ्लॉप चित्रपट आहे, असं म्हणणाऱ्या पाकिस्तान्यांना त्यांना थेट चित्रपटाच्या कमाईचे आकडेच सांगितले आहेत.

‘प्रो पाकिस्तान कंटेट काय असतो?’

ज्या सहा अरब देशांनी धुरंधरवर बंदी घातलीय, त्यांचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला आहे. ‘प्रो पाकिस्तान कंटेट काय असतो?’ असा सवाल मेजर गौरव आर्या यांनी विचारला आहे. “पाकिस्तानने असं काय केलय की तुम्ही बोलू शकता पाकिस्तानने चांगल काम केलय. पाकिस्तान बद्दल काही चांगलं दाखवावं अशी त्यांची कृती नसते. याला मार, त्याला मार हेच काम ते करु शकतात” अशा शब्दात पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला.

पाकिस्तानी सुद्धा बघत नाहीत

“ते बोलतात तुम्ही आमच्या विरोधात चित्रपट बनवलात, मग तुम्ही आमच्याविरोधात चित्रपट बनवा. तुम्ही बनवता सुद्धा, पण ते खूप घाणेरडे चित्रपट असतात, बजेट कमी असतं, कोणी बघत नाही, पाकिस्तानी सुद्धा बघत नाहीत. आम्हाला माहितीय पाकिस्तानी रात्री नेटफ्लिक्सवर इंडियन कंटेट बघतात. हेच पाकिस्तानी उद्या OTT वर धुरंधर चित्रपट आल्यानंतर बसून बसून पाहणार आहेत” असं मेजर गौरव आर्या म्हणाले.