तारक मेहता मालिकेत 8 वर्षानंतर परतणार दयाबेन? अखेर मोठा खुलासा, निर्मात्यांनी थेट..
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, मालिकेतून अनेक कलकारा निरोप घेत आहेत. नवीन चेहरे मालिकेत दाखल झाली आहेत. मात्र, प्रेक्षक वाट बघत आहेत ती म्हणजे दयाबेनची... त्याबद्दल आता मोठे अपडेट पुढे आले.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. अत्यंत मोठा चाहतावर्ग मालिकेचा असून लोक प्रेम मालिकेवर करतात. अनेक कलाकार मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. टप्पू सेना अगोदर लहान होती आता तीही मोठी झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेला घरघर लागल्याचे बघायला मिळतंय. अनेक वर्ष मालिकेत धमाकेदार भूमिका करणारे काही कलाकार मालिकेला सोडून गेले. फक्त मालिकेला सोडूनच नाही तर त्यांनी तारक मेहता मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केली. जुने कलाकार मालिका सोडत असतानाच नवीन काही कलकारही मालिकेत दाखल झाले आहेत. टप्पू के पापा… टप्पू के पापा… हे दयाबेन अर्थात दिशा वकानीचे शब्द ऐकण्यासाठी चाहते आतूर आहेत. 2017 पासून दिशा वकानी मालिकेपासून दूर आहे.
लग्न झाल्यानंतरही दयाबेन मालिकेत धमाकेदार भूमिका करताना दिसली. मात्र, डिलीवरीच्या काही दिवस अगोदर दयाबेन सुट्टीवर गेली आणि परत मालिकेत परतलीच नाही. चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून दयाबेनची वाट पाहात आहेत. आता दयाबेन मालिकेत नक्की कधी परतणार याबाबत मोठा खुलासा झाला आहे. कायमच असित मोदी हे दयाबेनला मालिकेमध्ये परत आणण्याबद्दल भाष्य करताना दिसतात.
आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अब्दूल भाईची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात शरद संकला यांनी मोठा खुलासा केला. शरद संकला यांनी म्हटले की, मला वाटत नाही की, हे सध्या शक्य आहे. पण काही सांगणेही कठीण आहे. असे होऊ पण शकते की दिशा वकानी मालिकेत येईल किंवा नाही पण. मालिकेच्या निर्मात्यांना अजिबात वाटत नाही की, मालिकेतील जुन्या कलाकारांनी मालिका सोडावी. दिशा वकानीने 8 वर्षापूर्वी मालिका सोडली, असे असलेतरीही अजूनही मालिका चांगली सुरू आहे.
लोक आताही मालिका बघतात. असितकुमार मोदी वाट पाहत आहेत. दिशा वकानी वापस आली तर ती खरोखरच खूप चांगली आणि जबरदस्त गोष्ट असेल पण आता दुसरा पर्याय शोधणेही आवश्यक आहे. असित मोदींना मनातून वाटते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये जे मूळ कलाकार आहेत, त्यांनी मालिका सोडू नये.
पण दिशा वकानी यांच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे आणि ती काय निर्णय घेईल, यावर मी कमेंट करणे योग्य नाही. मुळात म्हणजे प्रत्येकाचे खासगी आयुष्य असते. नक्कीच त्या पात्रावर चाहते खूप जास्त प्रेम करतात. त्यांची इच्छा आहे की, तिने परत यावे. विषय तोच आहे की, त्याठिकाणी दुसरा कोणता कलाकार आला तर चाहते त्याला स्वीकारतील का? कारण दिशा वकानी तिच्या खऱ्या आयुष्यात फार जास्त वेगळी आहे.
