
मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मलायका अरोरा आणि अरबाजने लग्नाच्या तब्बल 19 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याबद्दल कधीच भाष्य करण्यात नाही आले. घटस्फोटाच्या जवळपास 19 वर्षांनंतर आता अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत निकाह केलाय. दुसरीकडे मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यापासून विभक्त झाल्यापासून अर्जुन कपूर याला डेट करंतय. आता इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मलायका अरोरा ही घटस्फोटाबद्दल बोलता दिसली.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही घटस्फोटानंतर आयुष्य कसे बदलले याबद्दल बोलताना दिसली. मलायका अरोरा म्हणाली की, मी एक लेख वाचला, त्या लेखात लिहिले गेले होते की, मलायका ही महागडे कपडे घटस्फोटानंतर अरबाज खान याच्याकडून मिळालेल्या पोटगीमुळे घालू शकते. जे अत्यंत हैराण करणारे नक्कीच होते.
मलायका पुढे म्हणाली की, एखादी व्यक्ती खूप आणि कठोर परिश्रम करून आपली जागा बनवते. परंतू अशा काही गोष्टींमुळे आणि विधानांमुळे सर्व गोष्टी नक्कीच बिघडतात. मलायकाने म्हटले की, एक एकदम घाण आर्टिकल प्रकाशित केले गेले. त्यामध्ये थेट लिहिण्यात आले की, तिला हे सर्व का परवडते कारण तिला मोठी पोटगी मिळते.
हे वाचून मी नक्कीच आश्चर्यचकित झाले. कारण तुम्ही आयुष्यात काहीही केले आणि कुठेही तुमच्या मेहनतीने पोहचलात तरीही काहीही फरक पडत नाही. कारण शेवटी तुम्ही जे काही आहात ते फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणाऱ्या पोटगी मिळाल्यामुळेच आहात. तुमच्या नेटवर्कला काहीच किंमत नाहीये, असे म्हटले जाते.
मलायका अरोरा हिला अरबाज खान याच्याकडून मोठी पोटगी मिळत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. आता यावरच बोलताना मलायका अरोरा ही दिसत आहे. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केले. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा एक मुलगा देखील आहे. शूरा खान आणि अरबाज खान यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.