मलायका अरोराने अखेर सांगितलेच अरबाज खानसोबत घटस्फोट घेण्याचे ‘ते’ कारण, म्हणाली, माझ्यासाठी तो..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे.

मलायका अरोराने अखेर सांगितलेच अरबाज खानसोबत घटस्फोट घेण्याचे ते कारण, म्हणाली, माझ्यासाठी तो..
| Updated on: Mar 13, 2024 | 12:06 PM

मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या तब्बल 19 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय हे कळू शकले नव्हते. नुकताच आता अरबाज खान याने मलायका अरोरा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर शूरा खान हिच्यासोबत निकाह केलाय. या निकाहाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

नुकताच आता मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना मलायका अरोरा ही दिसलीये. पहिल्यांदाच अरबाज खान याच्यासोबत घटस्फोटावर आणि आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना देखील मलायका अरोरा ही दिसली आहे. आता मलायका अरोरा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

मलायका अरोरा ही म्हणाली की, माझ्या घरच्यांनी मला कोणताही दबाव आणला नाही. मात्र, मी अशा ठिकाणी वाढले आहे, जिथे योग्य वेळात तुमचे लग्न व्हायला हवे. पुढे मलायका म्हणाली की, लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर मला समजले की, मला जे हवे आहे ते हे नाहीये…अरबाजपासून वेगळे होताना मला अनेक प्रश्न केले गेले. हेच नाही तर मजाक देखील उडवला गेला.

मी जेंव्हा अरबाजसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझा खूप जास्त मजाक उडवला गेला. इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी अशा बऱ्याच महिला होत्या, ज्या घटस्फोट घेऊन जीवनात पुढे गेल्या होत्या. मुळात म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा घटस्फोटाकडे वेगवेगळ्या नजरेने बघतो. या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा हिने थेट सांगितले की, तिच्यासाठी अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेणे इतके सोपे नक्कीच नव्हते.

अरबान खान आणि मलायका अरोरा यांचा एक लेक अरहान हा देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणार आहे. अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नात धमाल करताना अरहान खान हा दिसला. सध्या अरबाज खान हा पत्नी शूरा खान हिच्यासोबत नेहमीच स्पाॅट होताना दिसतो. मलायका अरोरा देखील अर्जुन कपूर याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जाते.