AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन कपूर नाही तर, ‘या’ अभिनेत्यासोबत रोमाँटिक झाली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून म्हणाल…

malaika arora | विवाहित अभिनेत्यासोबत रोमाँटिक झाली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून म्हणाल...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, अभिनेत्रीसोबत दिसणारा 'तो' अभिनेता आहे तरी कोण?

अर्जुन कपूर नाही तर, 'या' अभिनेत्यासोबत रोमाँटिक झाली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Dec 30, 2023 | 1:19 PM
Share

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील एका व्हिडीओमुळे मलायका चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका अभिनेत्यासोबत रोमाँटिक डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या व्हिडीओची चर्चा आहे. व्हिडीओमध्ये मलायका बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत नाही तर, अभिनेता शोएब इब्राहिम याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये मलायका परीक्षकाची भूमिका साकारत आहे. शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मलायका आणि शोएब ‘गेरुआ’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चाहते आणि शोमधीस स्पर्धकांना देखील दोघांचा डान्स आवडला आहे.

सांगायचं झालं तर, रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगत असते. नुकताच अभिनेत्री दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर मलायका हिने 100 टक्के लग्न करणार असं उत्तर दिलं. म्हणून 2024 मध्ये मलायका लग्न बंधनात अडकणाक का? अशा देखील चर्चा रंगल्या आहेत.

लग्नाबद्दल काय म्हणाली मलायका अरोरा?

शोमध्ये मलायका म्हणाली, ‘100 टक्के लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल असं अभिनेत्री म्हणाली…’ मलायका हिने असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा अर्जुन कपूर याच्यासोबत असेल्या नात्याची चर्चा रंगत आहे.

नुकताच, मलायका अरोरा हिचा पहिला पती अरबाज खान याने दुसरं लग्न केलं आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाज खान याच्या लग्नात मुलगा अरहान खान देखील चर्चेत असतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान याने सावत्र आईसोबत डान्स देखील केला.

मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अरबाज याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. अभिनेत्री अर्जुन याच्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असते एवढंच नाही तर, दोघे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात.

Follow Us
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'