वयाच्या 51 व्या वर्षी मलायका अरोरा पुन्हा अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Malaika Arora on Second Marriage: घटस्फोटानंतर मलायका वयाच्या 51 व्या वर्षी दुसऱ्या लग्नासाठी तयार, आजच्या मुलींना मोलाचा सल्ला देत म्हणाली..., सध्या सर्वत्र मलायकाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा...

Malaika Arora on Second Marriage: घटस्फोटानंतर मलायका वयाच्या 51 व्या वर्षी दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. शिवाय अभिनेत्रीने आजच्या मुलींना देखील मोलाचा सल्ला दिला आहे…, सध्या सर्वत्र मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोर आनंदी आयुष्य जगत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत मलायका हिने दुसऱ्या लग्नावर देखील स्वतःचं मत स्पष्ट केलं.
दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझं दुसरं लग्न नेहमीच आवडेल, पण जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी मला प्रश्न विचारला. ‘पण आज मी आनंदी आहे. मी हा निर्णय घेतल्याबद्दल मला आनंद आहे. जेव्हा मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला स्वार्थी म्हटलं गेलं. पण मी कायम स्वतःला प्राधान्य दिलं.’
‘समाज म्हणतो की आधी तुम्ही तुमच्या मुलाचा, पतीचा आणि नंतर स्वतःचा विचार केला पाहिजे. पण मी आधी स्वतःचा विचार केला. आज मी पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे.’ असं देखील मलायका म्हणाली.
पुढे मलायकाला विचारण्यात आलं, आजच्या मुलींना सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? यावर अभिनेत्री म्हणाली, मी म्हणेन की लवकर लग्न करू नका. आधी स्वतःला समजून घ्या आणि काहीतरी करा किंवा व्हा, नंतर लग्नाचा निर्णय घ्या.
‘जीवनाचा आयुष्याचा आनंद घ्या आणि जेव्हा तुम्हाला सर्वकाही समजेल तेव्हाच लग्नासाठी तयार व्हा…’ पुढे मलायका हिला दुसऱ्या लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. म्हणजे वयाच्या 51व्या वर्षी देखील मलायका दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे.
दुसऱ्या लग्नाबद्दल मलायका म्हणाली, ‘मी खूप रोमँटिक आहे आणि दुसऱ्या लग्नाला मी कधीही नाही म्हणणार नाही. असं सांगून मलायकानं स्पष्ट केलं की तिला दुसऱ्यांदा सेटल होण्यास कोणतीही अडचण नाही.
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
