अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर बदलल्या ‘या’ मोठ्या गोष्टी; मलायकाचा खुलासा

घटस्फोटानंतर अरबाजसोबत कसं आहे नातं? मलायका म्हणते..

अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर बदलल्या या मोठ्या गोष्टी; मलायकाचा खुलासा
Malaika Arora, Arbaaz Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 02, 2022 | 4:52 PM

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांनी 2017 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. लग्नाच्या तब्बल 18 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतर (Divorce) मलायका अनेकदा तिच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने विभक्त झाल्यानंतर अरबाजसोबतचं नातं कसं आहे, याबद्दल सांगितलं. पहिल्यापेक्षा आता बऱ्याच गोष्टी दोघंही अधिक समजूतदारपणे हाताळत असल्याचं तिने सांगितलं. आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज हा जॉर्जिया अँड्रियानी या मॉडलेला डेट करतोय.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “कधीकधी दोन लोक खूप चांगले असतात. पण ते एकमेकांसाठी चांगले नसतात. आमचंही नातं असंच काहीसं आहे. तो नेहमीच खूश राहावा अशी माझी इच्छा आहे. आता आम्ही दोघं पहिल्यापेक्षा खूप अधिक समजूतदारपणे वागतो.”

या मुलाखतीत घटस्फोट घेण्यामागचं कारणसुद्धा मलायकाने सांगितलं. स्वत:ला प्राधान्य देण्यासाठी अरबाजपासून विभक्त झाल्याचं ती म्हणाली. त्याचप्रमाणे हा निर्णय घेतल्यामुळे स्वत:मध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचं तिने सांगितलं. मुलासोबतचंही नातं पहिल्यापेक्षा सुधारल्याचं तिने स्पष्ट केलं. “मी आता अधिक खूश आहे हे तोसुद्धा पाहतोय”, असं मलायका म्हणाली.

“तुमचं मन काय म्हणतंय तेच ऐका आणि पुढे निर्णय घ्या. काही काळ कठीण जाईल, आव्हानांचा सामना करावा लागेल, पण त्यापुढचं आयुष्य खूप बरं असेल”, असा सल्ला तिने महिलांना दिला.

मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये लग्न केलं होतं. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे सतत चर्चेत असते. या दोघांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे.