मलायका अरोराच्या बिकनी फोटोवरची अर्जुन कपूरची कमेंट पाहिली आहे का?, म्हणून तो आता चोर ठरतोय

अर्जुन कपूर आणि मलायका गेल्या काही दिवसांपासून आपल्या दोघांचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत आहेत. एकमेकांच्या फोटोवर त्या दोघांच्या रिअॅक्शनही बघायला मिळतात.

मलायका अरोराच्या बिकनी फोटोवरची अर्जुन कपूरची कमेंट पाहिली आहे का?, म्हणून तो आता चोर ठरतोय
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 5:22 PM

मुंबईः ऑरेंज रंगाचा बिकनी टॉप आणि ब्लॅक शॉर्टस, आणि डोळ्यावर तिला शोभणारा असा गॉगल लावून मलायका (Malaika Arorara) स्विमिंग पूलावर बसलेली आहे. मग तिच्या या फोटोवर (Photo) अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) कमेंट येणार नाही असं कधी होणार नाही. मलायकाने आपला कोणताही फोटो शेअर केला की, त्यात एक हमखास कमेंट दिसते ती म्हणजे, अर्जुन कपुरची. तिही अगदी भन्नाट असते. आणि त्यापेक्षा भन्नाट असते ती त्या कमेंटला दिलेली मलायकाचा रिप्लाय. कमेंट आणि रिप्लायचं युद्धही सोशल मीडियावरचे युजर्सही मजा घेतात.

मलायिका अरोरा आणि अर्जून कपूर बॉलीवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध जोडी आहे. ही दोघंही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचा अगदी बिनधास्त वावर असतो. कधी कधी ही दोघं एकमेकांच्या खिल्ली उडवण्यातही ही मागं नसतात. हीच गोष्ट आताच सिद्ध झाली आहे की, मलायिकाच्या एका फोटोवर अर्जून कपूरनं कमेंट केली आणि तो आता चोर ठरला आहे कारण, त्याच्या कमेंटला रिप्लाय चोर असाच देण्यात आला आहे.

संडे सनी साईड अप…

मलायिकाने दोन दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ऑरेंज कलरची बिकनी आणि ब्लॅक शॉर्टस आणि डोळ्यावर सुंदर असा गॉगल लावून स्विमिंग पुलाच्या काठावरचा तिचा फोटो तिनं शेअर केला आहे, तिने या फोटोत सूर्याकडे पाहतानाची पोज दिली आहे आणि त्या फोटोला कॅप्शन दिली आहे ती…संडे सनी साईड अप…

 

अच्छा कॅप्शन है…

मलायका अरोराच्या त्या फोटो कॅप्शनला ईमोजीबरोबरच अर्जुन कपूरने लिहिले आहे की, अच्छा कॅप्शन है. त्या कॅप्शनला मलायकाकडून आलेल्या ईमोजीवरून तर असं वाटत आहे की, अर्जुन कपूरला हे अपेक्षित नव्हतं. मलायकाच्या त्या कॅप्शनवर अर्जुनच्या ज्या काय भावना असतील त्या असतील मात्र त्यावरही तिने त्याला रिप्लाय दिला आहे. त्याच्या रिप्लायवर लिहितानी तिनं लिहिलय की, हे हे हे कॅप्शन चोर. त्यांची सोशल मीडियावर चाललेली जुगलबंदीने सोशल मीडियावरचे युजर्सही खूष झाले आहेत.

व्हिलन रिटर्न्स

अर्जुन कपूर आणि मलायका गेल्या काही दिवसांपासून आपल्या दोघांचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत आहेत. एकमेकांच्या फोटोवर त्या दोघांच्या रिअॅक्शनही बघायला मिळतात. अर्जुन कपूरचा आता व्हिलन रिटर्न्स हा चित्रपटा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत दिशा पाटनी, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यामध्ये झळकणार आहेत.

संबंधित बातम्या

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर आऊट, ‘या’ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनासाठी आलियाचा हटके अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली…

Mouny Roy Honeymoon Photos : अभिनेत्री मौनी रॉय काश्मिरमध्ये करतेय हनिमून इन्जॉय, तिचे बर्फातले फोटो बघाच!