
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपमुळे सतत चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिने अभिनेता अर्जुन कपूरला डेट केलं. जवळपास सहा वर्षे एकमेकांने डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर तिचं नाव मुलाच्या स्टायलिस्टशीही जोडलं गेलं. मध्यंतरीच्या काळात मलायकासोबत एका मिस्ट्री मॅनची तुफान चर्चा झाली होती. गायक ए. पी. ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने तिच्या आयुष्यातील या मिस्ट्री मॅनवरून पडदा उचलला आहे.
‘द नम्रता जकारिया शो’मध्ये मलायका नाराजी व्यक्त करत म्हणाली, “माझ्या नात्यांबद्दल नेहमीच चर्चा झाली. एक वेळ अशी आली होती, जेव्हा मी म्हटलं होतं की, माझं आयुष्य फक्त माझ्या खासगी आयुष्यापर्यंत मर्यादित नाही. परंतु लोकांना ही गोष्ट लक्षात राहिली नाही, कारण त्यावरून हेडलाइन बनली नव्हती. आज मी अशा टप्प्यावर आहे, जिथे मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. मला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो, मी फक्त त्याच गोष्टी करते. लोकांनी ही गोष्ट पहावी अशी माझी इच्छा आहे.”
अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर एका मिस्ट्री मॅनसोबत दिसल्याच्या वृत्तांबद्दल विचारलं असता मलायकाने अशी कोणतीही व्यक्ती तिच्या आयुष्यात असल्याला स्पष्टपणे नकार दिला. या सर्व कथा लोकांनीच बनवल्याचं ती म्हणाली. “लोकांना गॉसिप करायला आवडतं. तुम्ही एखाद्यासोबत बाहेर दिसलात की तो चर्चेचा मोठा विषय बनतो. मला अनावश्यक अफवांना खतपाणी घालायचं नाहीये. त्याचा काहीही अर्थ नाही. मी कधी एखाद्या जुन्या मित्रासोबत, समलैंगिक मित्रासोबत, विवाहित मित्रासोबत, मॅनेजरसोबत किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत दिसले तरी लगेच माझं नाव त्या व्यक्तीशी जोडलं जातं. आता तर आम्ही अशा चर्चांवर हसतो. माझी आई मला फोन करून विचारते, ‘आता हा कोण आहे बाळा? लोक कोणाबद्दल बोलत आहेत?’ हे सर्व आता मस्करीसारखं वाटतंय”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील एनरिक इग्लेसियासच्या कॉन्सर्टमध्ये या दोघांना पहिल्यांचा एकत्र पाहिलं गेलं होतं. हर्ष आणि मलायका यांच्या वयात तब्बल 17 वर्षांचं अंतर आहे. 33 वर्षांचा हर्ष हा हिरे व्यापारी असल्याचं कळतंय. तर मलायका 50 वर्षांची आहे.