Malaika Arora : उर्फी तर उगाच बदनाम.. भर कार्यक्रमात ट्रान्सपरंट ड्रेस पाहून मलायकावर भडकले नेटकरी

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या अजब-गजब फॅशनमुळे ट्रोलिंगची शिकार होते. उर्फीच्या ड्रेसिंगची आता नेटकऱ्यांनीही इतकी सवय झाली आहे की तिच्या कोणत्याही बोल्ड कपड्यांबद्दल आता त्यांना आश्चर्य वाटत नाही. मात्र बॉलिवूड कलाकार जेव्हा अशा अंदाजात दिसतात, तेव्हा त्यांना उर्फीची आवर्जून आठवण येते.

Malaika Arora : उर्फी तर उगाच बदनाम.. भर कार्यक्रमात ट्रान्सपरंट ड्रेस पाहून मलायकावर भडकले नेटकरी
Urfi Javed and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2023 | 10:44 AM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. जिम असो किंवा पार्टी लूक.. मलायकाच्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. मात्र अनेकदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मलायकाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ती अत्यंत बोल्ड कपड्यांमध्ये दिसली. तिचा हा अंदाज काहींना अजिबात पसंत पडला नाही. तर काहींनी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी केली. अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. पण मलायकाचे कपडे पाहिल्यानंतर ‘उर्फी उगाच बदनाम आहे’ अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली आहे.

या कार्यक्रमात मलायकाने ॲक्वा ब्ल्यू शिमरी ड्रेस परिधान केला होता. मात्र तिचा हा ड्रेस बराच ट्रान्सपरंट होता. कार्यक्रमात पोहोचण्याआधी तिने रेड कार्पेटवर पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘उर्फी तर उगाच बदनाम आहे, खरे दोषी हेच आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही कोणत्या कंपनीची अशी डिझाइन आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेचा विषय ठरते. अभिनेता अर्जुन कपूरला ती गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांना कुठेही एकत्र पाहिलं तरी सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होते.

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अर्जुनने इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटाच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला. मात्र त्याच्या या फोटोंवर कुठेच मलायकाची प्रतिक्रिया दिसली नव्हती. तर दुसरीकडे मलायकासुद्धा एकटीच मुंबईत आयोजित केलेल्या प्रसिद्ध ए. पी. ढील्लनच्या पार्टीला पोहोचली होती. प्रत्येक वेळी एकत्र दिसणारं हे कपल आता वेगळे का झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.