AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Malaika | अर्जुन-मलायकाचा ‘तो’ व्हिडीओ समोर; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

मलायका अरोरासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलासोबत जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर मलायकाने अर्जुनच्या कुटुंबीयांनाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. त्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाला की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

Arjun Malaika | अर्जुन-मलायकाचा 'तो' व्हिडीओ समोर; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम
Arjun Kapoor and Malaika Arora Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2023 | 8:21 AM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांना कुठेही एकत्र पाहिलं तरी सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. अर्जुन आणि मलायका कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते. इतकंच नव्हे तर मलायकाने त्याच्या कुटुंबीयांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं. त्यामुळे या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांदरम्यान अखेर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नुकतेच अर्जुन आणि मलायका मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटला गेले होते. या डिनर डेटचे फोटो आणि व्हिडीओ अर्जुनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत.

डिनर डेटनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर येतानाचा व्हिडीओ पापाराझींनीही सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी मलायका ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम अशा साध्या लूकमध्ये दिसली. तर अर्जुन कपूरसुद्धा कॅज्युअल लूकमध्ये होता. या व्हिडीओमध्ये अर्जुनच्या नव्या हेअरस्टाइलनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. अर्जुन आणि मलायकाला पुन्हा एकदा एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अर्जुनने इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटाच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला. मात्र त्याच्या या फोटोंवर कुठेच मलायकाची प्रतिक्रिया दिसली नव्हती. तर दुसरीकडे मलायकासुद्धा एकटीच मुंबईत आयोजित केलेल्या प्रसिद्ध ए. पी. ढील्लनच्या पार्टीला पोहोचली होती. प्रत्येक वेळी एकत्र दिसणारं हे कपल आता वेगळे का झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या होत्या. ‘परिवर्तन हाच प्रकृतीचा नियम आहे. जे लोक फक्त भूतकाळ आणि वर्तमानकाळाकडे पाहतात, ते नक्कीच भविष्याला गमावून बसतात’, अशी तिची पोस्ट होती. त्यामुळे अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच बिनसलंय, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?