मलायका अरोराचे 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत खास कनेक्शन… ‘ते’ फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील मलायका स्वतः पेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

मलायका अरोराचे 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत खास कनेक्शन... ते फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
Malaika Arora
| Updated on: Feb 22, 2026 | 9:11 AM

मलायका अरोरा एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जी कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. अनेक आयटम सॉन्गमध्ये भन्नाट डान्स करत मलायका हिने चाहत्यांना देखील ताल धरायला लावला आहे. मलायका आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहे. पण खासगी आयुष्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चे असते. आता देखील मलायका हिचे एका पुरुषासोबत फोटो व्हायरल होत आहेत. स्वतःपेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत मलायका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिरे व्यापाऱ्याचं नाव हर्ष मेहता असं असून दोघे एकत्र फिरायला गेल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत.

सध्या हर्ष आणि मलायका यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण यावर मलायकाने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सांगायचं झालं तर, रेडिटवर हर्ष आणि मलायका यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे देघांच्या रेलिशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

प्रसिद्ध ट्रेव्ही फाउंटनजवळ हे दोघेही सेल्फीसाठी पोज देताना दिसले. दोघांचा फोटो व्हायरल होताच, त्यांच्या डेटिंगबद्दलच्या अटकळांना पुन्हा एकदा वेग आला. पण व्हायरल होत असलेल्या फोटोवर मलायका आणि हर्ष यांनी कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. अनेक नेटकऱ्यांनी दोघे रिलेशनशिपमध्ये असतील असं म्हटलं आहे, तर अनेकांनी पीआर स्टंट असू शकतं… असं देखील म्हटलं आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअप…

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपचं कारण कधीच समोर आलं नाही. त्यावेळी, अशी चर्चा होती की मलायका किंवा अर्जुन दोघांपैकी कोणीही लग्न करू इच्छित होतं आणि तर एक जण लग्नासाठी तयार नव्हतं… म्हणून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… 2024 मध्ये दिवाळी पार्टीत आलेल्या अर्जुन याने स्वतःला सिंगल घोषित केलं.. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कधीच एकत्र दिसले नाहीत.

मलायका अरोरा आणि अरबाज खान

वयाच्या 22 व्या वर्षी मलायका हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अरबाज आणि शूरा यांनी लेकीचं जगात स्वागत देखील केलं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us