
Malaika Arora Viral Post: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आधी घटस्फोट नंतर स्वतःपेक्षा लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप… अशा खासगी आयुष्यामुळे मलायका कायम चर्चेत असते. आता देखील मलायका एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका कायम सोशल मीडियावक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असते.
आता देखील एक इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत मलायकाने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री म्हणते, ‘वय वाढत जातं तसं आपल्या संघर्ष नाही तर, आयुष्यात शांती आणि समाधन हवं असतं. इज्जत नसलेल्या ठिकाणा राहण्यापेक्षा दुसरा मार्ग शोधतो. नाटक तर बिलकूल सहन होत नाही आणि मानसिक शांतीला आपण सर्वात जास्त प्राधान्य देतो…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आपण आपल्या आजू- बाजूला अशा लोकांना ठेवतो ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल.., अशी लोकं जी तुमच्यासाठी चांगली असतील…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘तुमच्या आत्मविश्वासात वास्तव बदलण्याची शक्ती आहे. अशा परिस्थितीत, काही लोक तुम्हाला अहंकारी म्हणतील, पण काही लोक तुम्हाला अननुभवी देखील म्हणतील. पण जे लोक असा विचार करतात की तुमच्यासोबतच चांगल्या गोष्टी घडत आहेत, ते अगदी बरोबर आहेत…’ असं देखील मलायका म्हणाली.
मलायका अरोरा राजस्थान रॉयल्सला चियर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. जिथे अभिनेत्री क्रिकेटर कुमार संगकारासोबत बसलेली दिसली. दोघांचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण यावर कुमार संगकारा आणि मलायका अरोरा यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
अभिनेत्री मलायका अरोरा हिने अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे वाद समोर येवू लागले. अखेर एकदा अर्जुन कपूर याने मी सिंगल आहे… असं सांगितलं आणि रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.