Malaika Aroara Father : मी खूप थकलोय… मृत्यूपूर्वी मलायकाच्या वडिलांनी कोणाला केला शेवटचा फोन ? कॉल डिटेल्समध्ये या व्यक्तीचं नाव…

Malaika Arora Father Death: मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या आत्महत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी अनिल यांनी एका व्य्कतीला फोन केला होता. त्यांच्या कॉल डिटेल्सध्ये जे नाव समोर आलं आहे...

Malaika Aroara Father : मी खूप थकलोय... मृत्यूपूर्वी मलायकाच्या वडिलांनी कोणाला केला शेवटचा फोन ? कॉल डिटेल्समध्ये या व्यक्तीचं नाव...
Image Credit source: instagram
| Updated on: Sep 12, 2024 | 8:52 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काल, ( बुधवार 11 सप्टेंबर) सकाळी मलायकाच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीतून खाली उडी मारून जीव दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ माजली असून मलायका, अमृता अरोरा आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मलायका आणि अमृता या दोघीही वडिलांच्या निधनामुळे अतिशय खचल्या असून त्यांना हा धक्का सहन होत नाहीये. बुधवारी रात्री उशीरा मलायका-अमृता त्यांच्या आई-वडिलांच्या घरातून बाहेर पडताना दिसल्या. त्यावेळी त्यांची जवळची मैत्रिण करीना कपूर खान, करिश्मा कपूर तसेच अर्जुन कपूर हाही सोबत दिसला.

मलायकाचे वडील अनिल मेहता हे गेल्या काही काळापासून आजारी होते. गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, मात्र तेव्हा त्यांच्यावर नेमक कसले उपचार सुरू होते, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. अनिल मेहता यांनी बुधवारी इपारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष् संपवलं, या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. त्याचदरम्यान पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. मृत्यूपूर्वी अनिल यांनी काही फोन केले होते, त्यांच्या कॉल लिस्टमध्ये कोणाचं नाव होतं ते आता समोर आलंय.

अमृताशी झालं होतं अनिल यांचं बोलणं ?

अनिल अरोरा आणि मलायकाची आई हे दोघे वांद्रे येथील आयेशा मनोर या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून रहात होते. बुधवारी उडी मारून जीवन संपवण्यापूर्वी अनिल यांनी लेकीला फोन केला होता. अमृता अरोरा ही अनिल यांच्या अतिशय जवळची होती, त्यांचा खास बॉन्ड होता. अमृता ही मलायकाची धाकटी बहीण असून ती देखीव चित्रपटसृ्ष्टीत कार्यरत होती. मृत्यूपूर्वी अमल यांनी अमृता हिला फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कॉल डिटेल्समध्ये अमृताचं नाव समोर आलंय. ‘ मी आजारी आहे, खूप थकलोय’असा संवाद त्यांचा मुलीशी झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. अमृता वडिलांची खूप लाडकी होती.

दिग्गजांनी घेतलं अंत्यदर्शन

अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक दिग्गज कलाकार मलायकाच्या घरी पोहोचले. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा मलायका पुण्यात होती, ती तातडीने मुंबईला यायला निघाली. मात्र त्यापूर्वी मलायकाचा माजी पती आणि अभिनेता अरबाज खान तसेच अर्जुन कपूर हे दोघे निवासस्थानी पोहोचले. अनेक दिग्गजांनी घरी जाऊन अरोरा कुटुंबाचे सात्वंन केले. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, काजोल, सैफ अली खान, सलीम खान, हेलन, सीमा सजदेह, अनन्या पांडे, चंकी पांडे, भावना पांडे, शिबानी दांडेकर असे अनेक कलाकार मलायकाच्या घरी पोहोचले .

मलायकच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वांद्रे पोलिसांनी एडीआर दाखल करुन घेतली आहे. तसेच अनिल मेहता यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अनिल अरोरा यांचा जन्म पंजाबच्या फाजिल्का शहरात एका हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचा विवाह जॉयस पॉलीकार्प यांच्याशी झाला होता. दोघांना मलायका आणि अमृता या दोन मुली आहेत. दोन्ही मुली या चित्रपटसृष्टी आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला त्यावेळी मलायका पुण्यात होती. पित्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मलायका तातडीने मुंबईत आली. दोन्ही बहिणी साश्रूनयनांनी घरी पोहोचल्या.