AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेश्याव्यवसायत प्रसिद्ध अभिनेत्रीचा हात, तरुणीला बोलावलं आणि…, पोलिसांकडून चौकशी सुरु

Famous actress in Prostitution case: धक्कादायक..., जवळच्या नातेवाईकाच्या मुलीची फसवणूक, वेश्याव्यवसायात वेश्याव्यवसायत प्रसिद्ध अभिनेत्री, मोठं रहस्य समोर... अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात...

वेश्याव्यवसायत प्रसिद्ध अभिनेत्रीचा हात, तरुणीला बोलावलं आणि..., पोलिसांकडून चौकशी सुरु
फाईल फोटो
| Updated on: Aug 15, 2025 | 12:05 PM
Share

Famous actress in Prostitution case: झगमत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींचं नाव वेश्याव्यवसाय प्रकरणात समोर आलं आहे. आता लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री मीनू मुनीर हिला तामिळनाडू पोलिसांनी एका जुन्या प्रकरणात तिच्या घरातून अटक केली आहे. संबंधित प्रकरण हे 2014 मधील आहे. जेव्हा अभिनेत्रीने जवळच्या नातेवाईकांच्या मुलीला अभिनय विश्वात काम देण्याचं आमिष दाखवत वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. तर संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घ्या…

मल्याळम अभिनेत्रीवर वेश्याव्यवसायाचा आरोप

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनू मुनीर हिला बुधवारी रात्री केरळ येथील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिरुमंगलम पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पीडितेने आरोप केला होता की, तिला सिनेमात काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून चेन्नईला नेण्यात आलं आणि तेथील सेक्स रॅकेटमध्ये सामील होण्यास भाग पाडण्यात आले.

2024 मध्ये देखील अभिनेत्रीला झालेली अटक….

याआधी 2024 मध्ये मीनू वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जेव्हा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक बालचंद्र मेनन यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल कोची सायबर क्राइम पोलिसांनी तिला अटक केलेली. पण, त्या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिनेत्रीने आत्मसमर्पण केलं. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर अभिनेत्रीला जामिन मंजूर झाला…

अनेदका वादग्रस्त अडकली मीनू मुनीर…

मीमू मुनीर हिचं नाव अनेकदा वादग्रस्त परिस्थितीत अडकलं आहे. एक वेळ अशी देखील होती जेव्हा अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत महिलांच्या हक्कांसाठी लढणारा एक मजबूत आवाज म्हणून स्वतःची स्थापना केली होती, परंतु गेल्या काही वर्षांत एकामागून एक आरोप झाल्यामुळे तिची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे.

सध्या तरी. पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. यामागे काही मोठे रॅकेट आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. दरम्यान, मीनू मुनीरच्या कायदेशीर टिमचं म्हणणे आहे की तिला या प्रकरणात अडकवलं जात आहे आणि योग्य वेळी सत्य समोर येईल. याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याआधी देखील बळजबरीने वेश्याव्यवसायात अडकलेल्या तरुणींंची सुटका केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.