
बॉलिवूडमध्ये जसे चांगले अनुभव आहेत तसेच अनेक अभिनेत्रींना वाईट अनुभव देखील आले आहेत. अनेक अभिनेत्रींना स्ट्रगलच्या काळात कास्टिंग काउचे अनुभव आले आहेत. काही अभिनेत्री याबाबत स्पष्ट बोलल्या तर काहींनी विषय टाळले. पण अशीच एक अभिनेत्री आहे जिने हीट चित्रपट दिले आहेत, तिच्या बोल्ड अवताराने सर्वांना घायाळ केलं होतं पण सुरुवातीच्या काळात तिला अनेक वाईट अनुभव आले आहेत. तिने स्वत: एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
बोल्ड अन् बिंधास्त अभिनेत्रीने कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सागंतिले
ही बोल्ड अन् बिंधास्त अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. तिच्या पहिला चित्रपट ख्वाहिशची कथा एक रोमँटिक ड्रामा होती, ज्यामध्ये प्रेम, लग्न आणि नातेसंबंधांमधील चढ-उतार दाखवले गेले होते. पण त्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मल्लिकाचे बोल्ड सीन्स ठरले. त्यानंतर तिला आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल तसेच या मुद्द्यावर तिने धक्कादायक विधान केलं आहे.
काही हिरो तिला रात्री फोन करून त्यांना भेटण्यासाठी आग्रह करायचे
मल्लिका म्हणाली की तिने अनेक अभिनेत्रींना उघडपणे कास्टिंग काउचबद्दल बोलताना पाहिलं आहे. मल्लिकाने या मुद्द्यावर एक धक्कादायक विधानही केले आहे. तिने म्हटले आहे की काही हिरो तिला रात्री फोन करून त्यांना भेटण्यासाठी आग्रह करायचे. आजकाल, अनेक अभिनेत्री कोणत्याही ग्लॅमरपासून ते बोल्ड अशा सर्व प्रकारच्या भूमिका करतात. कारण ते फक्त पडद्यावरच असतं.
फोन करून घाणेरड्या डिमांड करायचे.
दरम्यान, एका जुन्या मुलाखतीत मल्लिका म्हणाली होती की, “अनेक अभिनेते असे होते जे रात्री मला भेटायला बोलावायचे. ते मला वारंवार त्रासही द्यायचे. मला फोन करून घाणेरड्या डिमांड करायचे. पण मी का जाऊ? मी फक्त पडद्यावर बोल्ड सीन्स दिले आहेत? पण खऱ्या आयुष्यात तशी नाहीये. मी मोठ्या अभिनेत्यांशी तडजोड करू शकत नसल्यामुळे, मला मिळालेल्या चित्रपटांच्या ऑफरही गायब झाल्या. मी तशी नाही. पडद्यावर बोल्ड दिसली म्हणून मी खऱ्या आयुष्यातही अशीच होईन असा विचार करणे चुकीचे आहे,” असं म्हणतं तिने तिला आलेला अनुभव सांगितला.
Mallika Sherawat Instagram
“कॉम्प्रमाईज” करण्यास नकार दिल्याने चित्रपटांच्या ऑफर्स कमी मिळू लागल्या.
मल्लिकाने भावनिकपणे सांगितले की, कॉम्प्रमाईज करण्यास तिने नकार दिल्यामुळे तिला चित्रपटांच्या ऑफर्स कमी मिळू लागल्या. एकेकाळी हॉट ब्युटी म्हणून इंडस्ट्रीमध्ये नाव असणारी अभिनेत्री आता ऑफर्सची वाट पाहत आहे. बॉलिवूडमध्ये स्टार हिरोईन म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर ती तिच्या धाडसीपणासाठी ओळखली जाऊ लागली आहे. मल्लिकाने अनेक टॉप अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. तिने हॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावलं. चित्रपटांसोबतच, मल्लिका नेहमीच तिच्या वैयक्तिक बाबींमुळे चर्चेत राहिली आहे. अनेक स्टार हिरोंसोबत डेटिंग केल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.