AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण..; मोठ्या पडद्यावर लेकीला पाहून मानसी कुलकर्णी भावूक

आगामी 'द्विधा' या चित्रपटातून अभिनेत्री मानसी कुलकर्णीची लेक ओवी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे पडद्यावर या मायलेकींचं अभिनय पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. ओवीला अभिनय करताना पाहणं हा अत्यंत भावनिक क्षण होता, अशा शब्दांत मानसी व्यक्त झाली.

हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण..; मोठ्या पडद्यावर लेकीला पाहून मानसी कुलकर्णी भावूक
मानसी कुलकर्णी, ओवी कुलकर्णीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 27, 2026 | 8:46 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असतं. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णीने साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा’ चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या पडद्यावरचा हा पहिलाच ‘ऑनस्क्रीन’ प्रयत्न असूनही तिने आत्मविश्वास, आणि निरागसतेनं ही भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केलं असून निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. येत्या 21 ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याविषयी अभिनेत्री मानसी कुलकर्णीने सांगितलं, “श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना अभिमान वाटत होता, सोबत तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून समाधान मिळालं. तिने ही भूमिका मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे.”

पहिल्याच अभिनय अनुभवाबद्दल ओवी म्हणाली, “सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आई आणि संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी ही भूमिका आत्मविश्वासाने करू शकले. ‘द्विधा’मधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.”

‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नसून, प्रत्येक नात्यातील प्रेम,विश्वास आणि भावभावनांचा हळवा प्रवास संवेदनशीलतेने मांडणारा चित्रपट आहे. या दोघींसोबत सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.

मानसी कुलकर्णीन विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘तारिणी’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेच्या निमित्ताने मानसीने तब्बल दहा वर्षांनंतर मालिकाविश्वात कमबॅक केलं होतं.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...