Fitness Mantra : 56 वर्षाची अभिनेत्री, दिसते मात्र 28 वर्षांची तरुणी, फिटनेसचं सिक्रेट काय?

56 व्या वर्षीही मनीषा कोईराला आपल्या फिटनेस आणि शरीराच्या लवचिकतेकडे विशेष लक्ष देते. तिच्या रुटीनमध्ये योग, स्ट्रेचिंग, मोबिलिटी, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वॉकिंगचा समावेश आहे.

Fitness Mantra : 56 वर्षाची अभिनेत्री, दिसते मात्र 28 वर्षांची तरुणी, फिटनेसचं सिक्रेट काय?
MANISHA GOIRALA HEALTH
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 05, 2026 | 6:51 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांचा फिटनेस हा नेहमी चर्चेचा विषय असतो. प्रत्येकालाच वाटत कि त्यांच्या सारखी आपलीही बॉडी हवी. प्रत्येक महिलेला तर हमखास हिरोईनसारखी स्लिम ट्रिम बॉडी हवी असते. अभिनेत्री मनीषा कोईराला ही देखील 56 वर्षांची आहे. तरी या वयात सुद्धा तिचा फिटनेस अनेक तरूणींना लाजवणारा आहे. या वयातही शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी लवचिकता, ताकद टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करतात त्यांच्या रुटीनमध्ये फक्त जिमच नाही तर स्ट्रेचिंग, मोबिलिटी,योग, वॉकिंग आणि संतुलित आहाराचाही समावेश आहे.

मोबिलीटी आणि स्ट्रेचिंगला महत्त्व

मनीषा नियमितपणे मोबिलिटी एक्ससरसाईज आणि स्ट्रेचिंग करते. मोबिलिटीमुळे शरीरातील सांध्यांची हालचाल आणि हालचालींची रेंज सुधारण्यास मदत होते, तर स्ट्रेचिंगमुळे स्नायूंचा लवचिकपणा टिकून राहतो. स्नायू मजबूत होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हाला लवचिक शरीर हवे असेल तर हे व्यायाम दररोज करावे.

Loading...

योग आणि मेडिटेशनही रूटीनचा भाग

मनीषा दररोज साधारण 40 मिनिटे योगा करते. योगासोबत त्या मेडिटेशनलाही वेळ देते. त्यांच्या रुटीनमध्ये शरीराच्या लवचिकतेसोबतच ते मन शांत ठेवण्यावरही भर देते.

स्ट्रेंथ ट्रेनिंगकडेही देते लक्ष

फक्त स्ट्रेचिंग किंवा योगावर तिचा व्यायाम थांबत नाही. तर मनीषा स्ट्रेंथ ट्रेनिंगवरही भर देते. त्यांच्या अलीकडील वर्कआऊटमध्ये योगा स्ट्रेचिंगनंतर लंजेस, लेग मूव्हमेंट्स आणि इतर स्ट्रेंथ एक्सरसाईज करताना ती दिसली होती. अशा प्रकारच्या व्यायामामुळे स्नायूंची ताकद आणि शरीराची स्थिरता टिकण्यास मदत होते.

वॉकिंग आणि सायकलिंगवरही भर देते

मनीषा घरात किंवा जिममध्ये व्यायाम करण्यासोबतच बाहेर वॉकिंग आणि सायकलिंग करायलाही आवडते. वेळ मिळेल तेव्हा ती या दोन्ही गोष्टी रूटीनमध्ये आठवणीने करते. त्यामुळे दिवसभर शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये दिसतो.

 

डाएटवर भर

फिटनेसासाठी ती शाकाहारी आणि संतुलित आहार घेण्यावर भर दिला आहे. तिच्या आहारात प्रोटिन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो. सकाळची सुरूवात कोमट पाण्याने, नाश्त्यात फळे आणि मोड आलेली कडधान्ये, रात्रीला हलके जेवण, वेळेवर जेवण या सगळ्या गोष्टी ती फॉलो करते.

व्यायामासोबत झोपेलाही महत्त्व

फिटनेस म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर शरीराला पुरेशी विश्रांती देणं देखील महत्त्वाचं आहे. मनीषा साधारण ६ ते ७ तास झोप घेते. त्यामुळे झोपही खूप महत्त्वाची आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us