AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life: आजही मोठं रहस्य आहे मनोज बाजपेयीचं पहिलं लग्न, 2 महिन्यात घटस्फोट, त्यानंतर मुस्लीम अभिनेत्रीसोबत थाटला संसार

Love Life: अभिनेता मनोज बाजपेयी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. त्याचं पहिलं लग्न तर आजही मोठं रहस्य आहे.

Love Life: आजही मोठं रहस्य आहे मनोज बाजपेयीचं पहिलं लग्न, 2 महिन्यात घटस्फोट, त्यानंतर मुस्लीम अभिनेत्रीसोबत थाटला संसार
| Updated on: Apr 23, 2026 | 10:51 AM
Share

Love Life: अभिनेता मनोज बाजपेयी याने एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. भूमिका निवडताना अभिनेत्याने कधीच सिनेमाचा बजेट पाहिला नाही. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्याचा एक निर्णय चुकला. मनोज आज दुसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण त्याच्या पहिल्या बायकोबद्दल अद्यापही फार कोणाला माहिती नाही. अभिनेता पहिल्या नजरेत एका मुलीच्या प्रेमात पडला आणि कुटुंबियांच्या विरोधात जात दोघांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर अभिनेत्याचा घटस्फोट झाला. ज्यामुळे मनोज प्रचंड खचला. पण त्याने स्वतःला सावरलं आणि आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांच्या यादीत त्याचं देखील नाव आहे.

मनोज बाजपेयी याचं पहिलं लग्न अद्यापही मोठं रहस्य…

मनोज बाजपेयी सध्या शबाना रजा हिच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे… पण फार कमी लोकांना माहिती आहे की, शबाना ही मनोज याची दुसरी बायको आहे… अनेकांना जाणून धक्का बसेल, पण शबाना हिच्यासोबत मनोज याचं दुसरं लग्न आहे… अभिनेत्याचं पहिलं लग्न 6 महिने देखील टिकलं नाही…

मनोज बाजपेयी याने दिल्ली येथे राहण्याऱ्या एका श्रीमंत घरातील मुलीसोबत लग्न केलं. जिचं नाव दिव्या असं होतं. पण त्यांचं लग्न दोन महिने देखील टिकलं नाही… दोन महिन्यात त्यांच्या घटस्फोट झाला. यामुळे मनोज याला मोठा धक्का बसलेला. कारण कुटुंबियांच्या विरोधात जात, अभिनेत्याने लग्न केलं होतं.

दिव्या हिच्याशी पहिली भेट आणि प्रेम

जेव्हा दिव्या दिल्लीच्या प्रसिद्ध ‘ॲक्ट वन’ नाट्यगटात सामील झाली, तेव्हा मनोज बाजपेयी तिला पहिल्यांदा भेटला. मनोज बाजपेयींप्रमाणेच दिव्यालाही नाटकात रस होता. ती दिल्लीत पदवीचे शिक्षण घेत होती आणि अभ्यासासोबतच तालमीसाठी नाट्यगटात येत असे. तिथेच त्यांची पहिली भेट झाली आणि मनोज दिव्याच्या पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेरीस या नात्याचे रूपांतर लग्नात झालं.

लग्नाच्या विरोधात होते कुटुंबिय

रिपोर्टनुसार, दिव्या आणि मनोज यांचे कुटुंबिय लग्नाच्या विरोधात होते. याबद्दल मनोज बाजपेयी पियुष पांडे लिखीत ‘कुछ पाने की जीद’ या पुस्तकात लिहिलं आहे. दिव्या श्रीमंत कुटुंबातून होती. तर मनोज स्ट्रगल करत होता… अशात कुटुंबियांच्या विरोधात जात पोलिसांच्या सुरक्षेत दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर अभिनेता आनंदी होता, पण दिव्या हिला पैशांची चणचण भासू लागली. आर्थिक अडचणी येत असल्यामुळे दोघांचं आयुष्य कठीण झालं होतं. कुटुंबियांच्या विरोधात लग्न केल्याचा दिव्यांला पश्चाताप होऊ लागलेला. अखेर लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

शबाना रझा हिच्यासोबत दुसरं लग्न…

मनोज बाजपेयी आता दुसरी बायको मुस्लीम अभिनेत्री शबाना रझा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांनी लेक नायला हिचं जगात स्वागत केलं… शबाना स्वतःच प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनेता बॉबी देओल पासून अभिनेता हृतिक रोशनल यांसारख्या अभिनेत्यांसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनयापासून दूर असलेली शबाना निर्मिती म्हणून काम पाहत आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात