Adinath Kothare : घटस्फोटानंतर आदिनाथ कोठारेकडून चाहत्यांना गुडन्यूज, मोठी अपडेट समोर
Adinath Kothare : मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चे आहे. आता देखील अभिनेत्याच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टीची चर्चा रंगली आहे, तर जाणून घ्या कोणती आहे ती खास गोष्ट...

Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारे याने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्यासोबत घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केली. ज्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता आदिनाथ त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आदिनाथ याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेता फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झाला आहे. ‘रामायण’ सिनेमानंतर आदिनाथ आणखी एका बॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. आता चाहते देखील आदिनाथ याला बॉलिवूडमध्ये पाहण्यास उत्सुक आहे.
सांगायचं झालं तर, ‘रामायण’ सिनेमात भरतची भूमिका साकारणार आदिनाथ आता ‘नई नवेली’ सिनेमातून सुद्ध प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात आदिनाथ याची मुख्य भूमिका असणार आहे. तर आदिनाथ याच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतम स्क्रिन शेअर करणार आहे . सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बालाजी मोहन यांच्या खांद्यावर असणार आहे. सिनेमात कथा कौटुंबिक मनोरंजनाभोवती फरताना दिसणार असून ‘नई नवली’ सिनेमा 16 ऑक्टोबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील आदिनाथ आणि यामी यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, सिनेमा ओटीटी आणि टेलिव्हिजन अशा तिन्ही माध्यमांवर एकाच वेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता ‘रामायण’ आणि ‘नई नवेली’ या बॉलिवूड सिनेमांमधून आदिनाथ चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदिनाथ याच्या सिनेमांची चर्चा रंगली आहे. तर मराठी छोट्या पडद्यावर देखील एका मालिकेच्या माध्यमातून आदिनाथ चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. मालिकेचा मुहूर्त देखील पार पडला आहे.
आदिनाथ कोठारे – उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
काहा दिवसांपूर्वीच आदिनाथ कोठारे – उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटा झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यामातून जाहिर केलं. . ‘आम्ही परस्पर सहमतीने आमचा पती – पत्नी म्हणून प्रवास संपवत आहोत. पण मुलीसाठी कायम एकत्र असू…’ असं पोस्टमध्ये नमूद करत त्यांनी विभक्त झाल्याचं केलं.