तुमचा मुलगा बायकांना मारतो आणि…, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडला घाबरली आई, कारण…

Marathi Actor Kiran Gaikwad : खलनायकाच्या भूमिकेत किरण गायकवाडला पाहून घाबरलेली आई, म्हणाली, 'तुमचा मुलगा बायकांना मारतो आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण गायकवाड याच्या वक्तव्याची चर्चा...

तुमचा मुलगा बायकांना मारतो आणि..., देवमाणूस फेम किरण गायकवाडला घाबरली आई, कारण...
फाईल फोटो
| Updated on: Oct 13, 2025 | 1:29 PM

Marathi Actor Kiran Gaikwad : ‘देवमाणूस’ मालिकेचा विषय निघाला तर गावतल्या देवमाणसाने आतापर्यंत किती बायकांची हत्या केली? असा प्रश्न तुमच्या देखील मनात देखील उपस्थित झाला असेल. सांगायचं झालं तर, ‘देवमाणूस’ मालिकेला प्रेक्षाकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. पण ‘देवमाणूस’ मालिकेत मुलाला भयानक काम करताना पाहून अभिनेत्याच्या आईला भीती वाटली. किरणच्या आईने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात मालिका आणि मुलाच्या भूमिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाली किरण गायकवाडची आई?

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात किरण गायकवाड याची आई म्हणाली, ‘सुरुवातीला मला अनेक बायका म्हणाल्या कसं वळण लावलं आहे तुम्ही तुमच्या मुलाला. बायकांना मारतो… त्यामुळे मी किरणला घरात देखील घेतलं नव्हतं… मला तुझी भीती वाटते… असं मी किरणला म्हणाले होते. मी तुझ्यावर असे संस्कार केले आहेत? तू असं काम करतोस? असं काम करु नकोस असं मी त्याला सांगितलं होतं…’ यावर किरण आईला म्हणालेला, ‘मी असं काहीही करत नाही. मालिकेतील ती माझी भूमिका आहे… ती भूमिका तशी आहे..’ असं किरण आईला म्हणालेला.

मुलाने कमावलेल्या यशाचं कौतुक करत किरण याची आई म्हणाली, ‘किरणची आई म्हणून लोकं ओळखतात तेव्हा खूप भारी वाटतं…’ एवढंच नाही तर, झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर किरण याच्या आईने एक इच्छादेखील व्यक्त केली. ‘मी शालेय शिक्षण घेतलेलं नाही. पण मला मालिकेत काम करायचं आहे…’ असं किरण याची आई म्हणाली.

‘देवमाणूस’ मालिकेतील किरण याच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, किरण पैशांच्या हव्यासापोटी किरण महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे, दागिने घेतो आणि महिलांचा खून करतो… मालिकेत गावासमोर देवमाणून म्हणून फिरणाऱ्या किरण याने स्वतःचा खरा चेहरा लपवण्यासाठी अनेकांचे प्राण घेतले. मालिकेत त्याची ओळख देवीसिंग, अजितकुमार आणि गोपाळ अशा अनेक नावांनी आहे.

किरण गायकवाड याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘देवमाणूस’ मालिकेत अभिनेता खलनायकाच्या भूमिकेला योग्य न्याय देताना दिसत आहे. त्याच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला. फक्त ‘देवमाणूस’ नाही तर, ‘लागीरं झालं जी’ मालिकेत देखील अभिनेत्याने खलनायक म्हणून काम केलं. मालिकेमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे.