AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Damle | प्रशांत दामले यांना मातृशोक; आई विजया दामले यांचं निधन

मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांच्या आईचं बुधवारी सकाळी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

Prashant Damle | प्रशांत दामले यांना मातृशोक; आई विजया दामले यांचं निधन
Prashant DamleImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2023 | 4:12 PM
Share

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई विजया दामले यांचं आज (बुधवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रशांत दामले हे काही कामानिमित्त मुंबईबाहेर होते. तेव्हा त्यांना आईच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विजया दामले यांच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत दुपारी 4 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पाडले जातील.

प्रशांत दामले हे नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत दामले हे त्यांच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी जवळपास महिनाभर अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. येत्या 8 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असा महिनाभर हा दौरा होता. कोणतंही नाटक असो, ते प्रशांत दामले यांच्या नावावर चालणारच, अशी खात्री असते. नाट्यक्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी 12 हजार 500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठला होता.

निर्मिती क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. प्रशांत फॅन फाऊंडेशन ही त्यांची स्वत:ची संस्था आहे. या संस्थेद्वारे ते अनेक सामाजिक कार्य करतात. महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी त्यांनी एक लाख रुपये दिले होते. प्रशांत दामले हे गेली तीन दशके मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत.

सुरुवातीला नाटक हा छंद आणि पैशांसाठी नोकरी हे गणित प्रशांत दामले यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याही डोक्यात पक्कं होतं. मात्र आई आणि पत्नी यांच्या पाठिंब्यामुळेच 1992 मध्ये त्यांनी पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. रंगभूमीवरील या यशाचं श्रेय ते आई आणि पत्नीला देतात.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?