
माणसांपेक्षा प्राण्यांची माया, प्रेम फार मोलाचं असतं म्हणतात आणि ते खरं देखील आहे. सध्या ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माधुरीला निरोप देताना गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
गावातून हत्तीणी देखील जायचं नव्हतं स्वतः माधुरी देखील गाव सोडून जाताना रडली. आता गावार पुन्हा माधुरीला आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. यावर मराठी कलाकर देखील पुढे येत स्वतःचं मत व्यक्त करत आहेत. अनेत सेलिब्रिटींनंतर स्वप्नील राजशेखर यांनी देखील इन्स्टाग्रामवर माधुरीचा फोटो पोस्ट केला आहे.
अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत… @PETA ही वन्यजीवांसाठी अनेक ठिकाणी उपकारक कार्य करत असेल.. परंतु “माधुरी” हत्तीणीबाबत मात्र थोडा आतताईपणा झालाय… इतकी वर्षे त्या मुक्या जिवाची आणि ग्रामस्थांची एकमेकांत मानसिक गुंतवणूक इतकी गहरी झालीय की हा दुरावा त्यांना मानवणारा नाही…शिरोळकर आक्रमक झाले आहेतच.. पण देव न करो तिकडे माधुरी आक्रमक झाली किंवा विरहाने तीच्या प्रकृतीवर बेतलं तर PETA च्या मूळ उद्देशालाच गालबोट लागेल….
अनेकदा नियम आणि कल्याणकारी वाटणारे उपाय सुध्दा परिस्थितीनुरुप बदलले जायला हवेत. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा यांचं मोल जाणुन मग निर्णय घ्यायला हवेत… माधुरी परत येत नाही तोवर ग्रामस्थ सुखाचा श्वास घेणार नाहीत आणि कदाचीत ती गजस्वामिनी सुध्दा…, सध्या स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, हत्तीणी अद्याप गुजरात येथे आहे, पण तिची नांदणी मठात परतण्याची शक्यता दाट आहे. कारण ग्रामस्थांच्या वेदना आणि प्रशासनावर असलेला दबावामुळे माधुरी पुन्हा तिच्या गावी परतण्याची शक्यता आहे. सामाजिक दबाव आणि राजकीय बैठका पुढील निर्णयांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतील… असं देखील सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, गावकऱ्यांनी ‘Jio Ban’ मोहीम सुरू केली आणि सिम‑पोर्टिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.