
Yashodhan Gadkari Video on Mumba devi Temple : मुंबई परप्रांतीयांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक ठिकाणी त्याचा प्रत्येय येत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. मराठी अभिनेते यशोधन गडकरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी मुंबईतील मुंबादेवी मंदिरातील सध्याची स्थिती दाखवली… सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांना व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
यशोधन गडकरी यांनी मंदिराच्या परिसरातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेते म्हणाले, ‘मुंबादेवी ही मुळची मराठी, आग्री आणि कोळी बांधवांची… पण याठिकाणी आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली… मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलं…’
‘कर्नाटकातील मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कर्नाटकात आल्यासारखं वाटतं, गुजरातमधील मंदिरात गेल्यानंतर गुजरात येथे आल्यासारखं वाटतं… त्याचप्रमाणे युपी आणि बिहार येथे गेल्यानंतर आपल्याला तेथील अनुभव येतो… वैष्णो देवीला गेल्यानंतर तिकडे गेल्याचा फिल येतो…’
‘पण याठिकाणी मंदिर परिसरात मराठीपण राहिलंय असं मला बिलकुलच वाटत नाही.. त्यामागे कारण देखील तसं आहे. पूजा साहित्य विकरणारे सगळे विक्रेते बऱ्यापैकी अमराठी दिसत आहे… मराठी माणसं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत… शिवाय वैष्णो देवीला मिळत असलेलं सामान येथे मिळत आहे. आपल्या पद्धतीतल्या ओट्या दिसत नाहीत… येथे ओट्या आणि पूजेचं साहित्य दिसायला हवं… असं मला वाटतं…’
‘शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण, सामावून घेत असताना मराठी माणूस कुठे आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा…’ असं देखील अभिनेते यशोधन गडकरी म्हणाले आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.