
Alka Kubal on Violence against Women: मला तर वाटतं त्या चार मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे होता. पोटच्या चार मुलींवर बाप बलात्कार करतो… महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोणत्याच भागात महिला सुरक्षित नाहीत. चूलत भाऊ, आत्येभाऊ, काका, मामा… एवढंच नाही तर, ज्या बापाने जन्म दिला तो बाप देखील पोटच्या लेकी बलात्कार करत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशात मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र अलका कुबल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
जळगावमध्ये झालेल्या खान्देश करिअर महोत्सव निमित्ताने अलका कुबल या जळगाव मधे आल्या होत्या, त्यावेळी अनेक सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर स्वतःचं मत मांडलं. ‘महिलांवर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढतच आहेत. अनेकदा तर घरातलेच घरातल्या महिलांवर अत्याचार करत असतात. कुठे चूलत भाऊ तर कुढे आत्येभाऊ असतो… यासाठी आपण पोलिसांना दोष देतो. पण यासाठी आजुबाजेचे लोकही जबाबदार आहेत.’
‘काही दिवसांपूर्वी मी एक बातमी वाचली बापानेच चार मुलींवर अत्याचार केले. मी तर म्हणते त्या चार मुलींना त्या नालायक बापाचा खून करायला हवा होता. इतका संतार होता. यासाठी आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला हवी… जशी सौदी यांसारख्या देशात होते…’
‘लोकांना कायद्याची भीती राहीली नाही. गुन्हा केल्यानंतर चार वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलं पुन्हा तेच… याला काहीच अर्थ नाही. समाजातील महिलांना, मुलींना वाचवायचं असेल तर पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे.’ यावेळी अलका कुबल यांनी पुण्यातील दोन तरुणांचं कौतुक देखील केलं.
अलक कुबल म्हणाल्या, ‘पुण्यात एका मुलीवर बलात्कार होत असताना दोन मुलं धावत आली आणि तिला वाचवलं… अशा मुलांचं मला खरंच कौतुक वाटतं… अशा प्रकारे एकत्र आल्यानंतर गुन्हेगार घाबरतील. कृत्य झाल्यानंतर बोलून त्याचा काही उपयोग नाही…’ असं देखील अलका कुबल म्हणाल्या.