घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायका अरोराच्या घरी काय झालं होतं?
Maliaka Arora : ‘अरबाजसोबत लग्न केलं कारण…’, लग्नाच्या 19 वर्षांनंतर घटस्फोट, मोठा निर्णय घेण्याच्या आदल्या रात्री मलायका अरोराच्या घरी काय झालं होतं? मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

Maliaka Arora : अभिनेत्री मलायका आरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर मलायकाने नव्या आयुष्याला सुरुवात केली. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगा देखील आहे. पण मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद कमी झाले नाहीत. अशात 2016 मध्ये मलायका हिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचं नक्की कारण काय यावर अरबाज आणि मलायका यांनी कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. पण घटस्फोटाच्या आदल्या दिवशी मलायकाच्या घरात कसं वातावरण होतं यावर एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं.
घटस्फोटावर कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होता आणि घरात केसं वातावरण होतं… असा प्रश्न अभिनेत्री करीना कपूर खान हिने मलायका हिला What Women Want या शोमध्ये विचारला होता. अरबाज याला घटस्फोट देण्याचा मलायका हिचा निर्णय कुटुंबियांना मान्य नव्हता. एवढंच नाहीतर, अरबाजसोबत लग्न का केलं? याचं कारण देखील अभिनेत्री सांगितलं होतं.
View this post on Instagram
मलायाका म्हणाली होती, ‘घटस्फोट घेऊ नकोस… हाच सल्ला मला सर्वांनी दिला होता. कोणीच तुम्हाला सांगणार नाही की, जा घटस्फोट दे… सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्फोटाचा निर्णय फार विचार करुन घेतला पाहिजे. मी घटस्फोटादरम्यान घडणाऱ्या गोष्टींचा सामना केला आहे…’
‘घटस्फोटाच्या आदल्या रात्री माझ्या कुटुंबियांनी मला बसवलं आणि विचारलं की, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? तुला तुझ्या करियरवर 100 टक्के विश्वास आहे का? ‘जी लोकं आपली काळजी करतात तेच असे प्रश्न विचारतात… जर तू घटस्फोटाचा निर्णय घेणार आहेत तर, तुझ्यावर आम्हाला गर्व आहे. कारण तू एक सशक्त महिला आहेस. अशा शब्दांमुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला…’ मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत.
