Prajkta Mali: प्राजक्ता नाही तर, ‘हे’ असतं अभिनेत्रीचं, म्हणाली, ‘आई प्रचंड चिडली कारण…’

Prajkta Mali: प्राजक्ता माळी कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री स्वतःच्या नावामुळे चर्चेत आली आहे. अशा प्रकारे प्राजक्ताने आईने ठेवलं लेकी नाव... अभिनेत्रीने सांगितला किस्सा....

Prajkta Mali: प्राजक्ता नाही तर, हे असतं अभिनेत्रीचं, म्हणाली, आई प्रचंड चिडली कारण...
फाईल फोटो
| Updated on: Oct 04, 2025 | 10:48 AM

Prajkta Mali: ‘रानबाजार’, ‘फुलवंती’, ‘हंपी’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने चाहत्यांच्या मनावर आणि मोठ्या पडद्यावर राज्य केलं. प्राजक्ता हिने फक्त सिनेमांमध्येच नाही तर, छोट्या पडद्यावर देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत. आज प्राजक्ता हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘फुलवंती’ सिनेमानंतर तर प्राजक्ताच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. आज प्राजक्ता फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर, नृत्यांगना आणि निर्माती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अभिनेत्री यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. पण ज्या प्राजक्ताला आपण आज प्राजक्ता म्हणून ओळखत आहोत, तिचं नाव आईने लीना ठेवण्याचा विचार केला होता… अशात अभिनेत्रीचं नाव प्राजक्ता कसं पडलं… याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे.

एका मुलाखतीत प्राजक्ता हिने तिच्या आईसोबत एका किस्सा शेअर केला. प्राजक्ता म्हणाली, ‘आई आणि माझं नातं फार जवळचं आहे… माझी आई माझ्यापेक्षा दहापट एनर्जेंटीक आणि जिद्दी आहे… माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं… कारण माझ्या आईला लीना चंदावरकर नावाची अभिनेत्री प्रचंड आवडायची… मी तिच्यासारखीच दिसते… असं आईचं म्हणणं होतं… त्यामुळे माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं…’

 

 

पुढे प्राजक्ता म्हणाली, ‘आम्ही राहत असलेल्या पोलीस लाईनमध्ये एका मुलीचा जन्म झालेला होता. त्या मुलीचं नाव लीना ठेवलं. त्यामुळे माझी आई प्रचंड चिडली… त्यामुळे माझी आई म्हणाली लीना नाव ठेवायचं नाही… त्यानंतर माझं नाव काय ठेवायचं यावर विचार सुरु झाला. आमच्या दारात तेव्हा प्राजक्ताचा सडा पडायचा… त्यामुळे माझ्या आईने माझं नाव प्राजक्ता असं ठेवलं… मला घरी सोनी असं देखील म्हणतात…’ असं देखील प्राजक्ता म्हणाली. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात  राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.