
Prarthana Behere on period: आज जग फार बदललं आहे. पण काही समजुती आजरी काही ठिकाणी तशाच आहे. अशीच एक समजूत म्हणजे मासिक पाळी दरम्यान देवाची पूजा करू नये… मासिक पाळीबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. विशेषत: पूजा, उपवास आणि मंदिरात जाण्याबाबत खूप कडक नियम आहेत. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण या दिवसांमध्ये महिलांवर अनेक निर्बंध लादले जातात…
दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने मासिक पाळीचा एक किस्सा सांगितला आहे. प्रार्थना जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करत होती, तेव्हा आलेल्या मासिक पाळीबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केलं आहे. तेव्हा मासिक पाळी सुरु असल्यामुळे ‘तू देवीचं दर्शन घेऊ शकत नाही…’ असं अभिनेत्री अनेकांनी सांगितलं. पण प्रार्थना हिने दर्शन घेतलं आणि देवीची माफी मागितली.
प्रार्थना म्हणाली, मला याठिकाणी एक किस्सा शेअर करायचा आहे. कोणत्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्यावर मला ती आईच वाटते…. आमच्या शाळेची सहल गुजरात येथील चामुंडा मातेच्या दर्शनासाठी गेली होती. आम्ही त्याठिकाणी खूप मज्जा करत होता. पण त्याच वेळी मला मासिक पाळी आहे. पहिल्या-दुसऱ्यांदाच मासिक पाळी आल्याने, मला देखील अंदाज नव्हता. मासिक पाळी आल्याने सगळे मला म्हणायला, तू देवीचं दर्शन घेऊ शकत नाही.’
‘त्यावेळी मला थोडी लाज वाटली. कारण मुलांना कसं सांगणार… मी दर्शनासाठी गेली नाही तर, सर्वांना कळेल… त्यामुळे मी दर्शनासाठी गेली… मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं, मला काहीही फरक पडत नाही… मी दर्शनासाठी जाणार… मला माहिती नाही हे चांगलं आहे की वाईट पण मी दर्शनासाठी जाणार…’
प्रार्थना पुढे म्हणाली, ‘दर्शनासाठी गेल्यानंतर मी देवीची माफी मागितली… देवी तू माझी आई आहेस आणि तू पण एक नारी आहेस… त्यामुळे हे दुःख – वेदना तुला माहीत आहे… मला माहिती आहे तू मला माफ करशील… माझं काही चूकलं असेल तर मला माफ कर… कोणत्याही देवीच्या दर्शनासाठी गेल्यावर मला माझी आई आणि माझ्या सासूबाई दिसतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.