उर्मिला कानेटकर हिचं घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं विधान, पहिल्यांदाच अभिनेत्रीने सोडलं मौन

Urmila Kanetkar On Adinath Kothare Divorce Rumors : उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे याच्या घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या? घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीने पहिल्यांदा सोडलं मौन... खासगी आयुष्यावर केलं मोठं विधान

उर्मिला कानेटकर हिचं घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं विधान, पहिल्यांदाच अभिनेत्रीने सोडलं मौन
Urmila Kanetkar
| Updated on: Nov 29, 2025 | 9:50 AM

Urmila Kanetkar On Adinath Kothare Divorce Rumors : मराठी सिनेविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत, जे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे… उर्मिला हिने सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. उर्मिला फक्त अभिनय आणि डान्समुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील उर्मिला तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त उर्मिला हिची चर्चा सुरु आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उर्मिला हिने गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून उर्मिला आणि अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

उर्मिला कानेटकर हिने सांगितल्यानुसार, ‘सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी फार विचार करत नाही… त्या चर्चा टॉक्सिकच असतात… सोशल मीडियावरील चर्चा काही खऱ्या असतात, तर काही खोट्या… मी माझ्या कामात इतकी व्यस्त असते की, कोण काय बोलत आहे… यावर लक्ष देणं मला फारसं गरजेचं वाटत नाही…

‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं देखील नाही… म्हणूनच लोकांनी देखील सोशल मीडियावर व्हयरल होणाऱ्या सर्वांत गोष्टींवर खरेपणाचा शिक्का मारणं देखील योग्य नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या उर्मिला हिने दिलेल्या उत्तराचं सर्वत्र कौतुक होत आहे.
उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे…

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये उर्मिला हिने आदिनाथ याच्यासोबत लग्न केलं आणि कोठारे कुटुंबाची सून झाली… त्यानंतर 2017 मध्ये उर्मिला हिने गोंडस मुलीला जन्म दिला. उर्मिला आणि आदिनाथ यांच्या मुलीचं नाव जिजा असं आहे…

मुलीच्या जन्मानंतर सर्वकाही सुरळीत सुरु असताना, उर्मिला आणि आदिनाथ यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आली… ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला… पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ‘सोशल मीडियावर रंगणाऱ्या सर्व गोष्टी खऱ्या नसतात…’ असं सांगत उर्मिला हिने घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं.